विनायक ढेरे
तिरूअनंतपूरम – ज्या केरळमध्ये सत्तेचा लंबक एकेकाळी डावी आघाडी आणि काँग्रेस आघाडी यांच्यात दर ५ वर्षांनी फिरायचा त्या केरळमध्ये काँग्रेसची अवस्था इतकी खस्ता झाली आहे, की मुस्लीम लीगच्या खांद्यावर काँग्रेस पोहोचली २३ वर अशी स्थिती येऊन ठेपली आहे.
चॅनेली आक्रस्ताळी चर्चांच्या पलिकडे जाऊन पाहिले, तर निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार केरळमध्ये सध्या काँग्रेस २३ जागांवर आघाडीवर आहे. तर मुस्लीम लीग १३ जागांवर आघाडीवर आहे. उत्तर केरळ अर्थात मलबारमध्ये मुस्लीम लीग काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष बनला आहे. ज्या वायनाडचे प्रतिनिधित्व राहुल गांधी लोकसभेत करतात, त्याच्या भोवतीचे बहुतेक मतदारसंघ मुस्लीम लीग काबीज करीत असल्याचे या निवडणूक ट्रेंडमधून स्पष्ट होताना दिसत आहे. मुस्लीम लीगचे भावंड इंडियन नॅशनल लीग १ जागेवर आघाडीवर आहे. तर केरळ काँग्रेस मणी ६ जागांवर आघाडीवर आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत ज्या काँग्रेसने २० पैकी १९ जागा जिंकल्या होत्या, त्या हिशेबात तर काँग्रेसने सुनामी निर्माण करून निवडणूक जिंकणे अपेक्षित होते. पण निवडणूक आयोगाचे अधिकृत आकडे पाहिले तर केरळमध्ये काँग्रेस पक्ष मुस्लीम लीगच्या बळावर म्हणजे त्यांच्याशी आघाडी केल्यामुळे २३ जागांच्या आघाडीवर पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. २०१९ नंतर अवघ्या दोन वर्षांत ही पक्षाची अवस्था येऊन ठेपल्याचे दिसत आहे. राहुल आणि प्रियांका गांधींच्या प्रचाराचा आणि राहुल गांधींच्या समुद्रतरणाचा आणि पोरीशी केलेल्या पुशअप्सच्या स्पर्धेचा फारसा उपयोग झाल्याचे दिसत नसल्याचेही स्पष्ट होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App