भारतीय कंपनी भारत बायोटेकने भारतीय वैद्यक परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने विकसित केलेली कोव्हॅक्सिन लस कोरोनाचे इतर प्राणघातक विषाणूचे 617 प्रकार नष्ट करण्यास सक्षम असल्याचे आढळले आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि अमेरिकेचे सर्वोच्च रोगशास्त्रज्ञ डॉ एनथोनी फाउंची हिच माहिती दिली आहे. कोव्हॅक्सिनच्या गुणवत्तेबाबत शंका घेऊन भारताच्या लसीकरण कार्यक्रमात अडथळा आणणारे कॉँग्रेस नेते जयराम रमेश आणि शशी थरुर यामुळे चांगलेच तोंडावर पडले आहेत.Covaxin has ability to destroy 617 strains of the virus, Jairam Ramesh, Shashi Tharoor slapped on the face
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय कंपनी भारत बायोटेकने भारतीय वैद्यक परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने विकसित केलेली कोव्हॅक्सिन लस कोरोनाचे इतर प्राणघातक विषाणूचे 617 प्रकार नष्ट करण्यास सक्षम असल्याचे आढळले आहे.
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि अमेरिकेचे सर्वोच्च रोगशास्त्रज्ञ डॉ एनथोनी फाउंची हिच माहिती दिली आहे. कोव्हॅक्सिनच्या गुणवत्तेबाबत शंका घेऊन भारताच्या लसीकरण कार्यक्रमात अडथळा आणणारे कॉँग्रेस नेते जयराम रमेश आणि शशी थरुर यामुळे चांगलेच तोंडावर पडले आहेत.
डॉ एनथोनी म्हणाले, भारतात आपण जी कठीण परिस्थितीत पाहात आहोत, लसीकरण त्यास उपयुक्त ठरू शकते. कोव्हॅस्किन सार्स-सीओव्ही-2 कोरोना विषाणूविरूद्ध अँन्टीबॉडीज बनविण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीला ओळखुन कार्य करते.
हे अँटीबॉडीज त्याच्या पृष्ठभागावर पसरलेल्या व्हायरल प्रोटीनसारख्या नियोजित स्पाइक प्रोटीनशी बांधले जातात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सहकायार्ने, भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिनचा वापर करण्यास 3 जानेवारी रोजी मान्यता देण्यात आली. चाचणी निकालानंतर ही लस 78 टक्के पर्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले.
फौसी यांनी म्हटले की, भारतात कोव्हॅक्सिन घेणाºया लोकांच्या डेटावरुन व्हॅक्सीनच्या प्रभावाविषयी माहिती मिळाली आहे. यामुळे भारतात गंभीर परिस्थिती असूनही लसीकरण खूप महत्त्वाचे ठरु शकते.
इंडियन काउंसिल ऑफमेडिकल रिसर्च ने 20 एप्रिलला म्हटले होते की, कोव्हॅक्सिन डबल म्यूटेंट कोरोना व्हेरिएंट्सच्या विरोधातही प्रोटेक्शन देते. आपल्या अभ्यासाच्या आधारावर म्हटले की, ब्राझील व्हेरिएंट्सचा आणि दक्षिण अफ्रीकी व्हेरिएंट्वरही ही व्हॅक्सीन प्रभावी आहे आणि त्यांच्याविरोधातही ही लस प्रोटेक्शन देते.
देशात सुरु असलेल्या दुसऱ्या लाटेसाठी या व्हेरिएंट्ला जबाबदार ठरवले जात आहे. खरेतर भारताच्या 10 राज्यांसमोर आलेल्या डबल म्यूटेंट कोरोना व्हेरिएंट् सर्वात घातक आहे. हे फक्त झपाट्याने ट्रांसमिट होत नाही तर खूप कमी काळात जास्त नुकसान पोहोचवते.
कोरोना व्हॅक्सीन बनवणारी हैदराबादची कंपनी भारत बायोटेक आणि आयसीएमआरने कोव्हॅक्सिनच्या तिस ऱ्या टप्प्याच्या अंतिम क्लीनिकल ट्रायल रिपोर्टमध्ये म्हटले होते की, कोव्हॅक्सिन क्लिनिकल 78% आणि कोरोनाने गंभीरित्या प्रभावित झालेल्या
रुग्णांवर 100% पर्यंत प्रभावी आहे. कंपनीने आपल्या एनालिसिसमध्ये कोरोनाचे 87 लक्षणांवर रिसर्च केला होता. व्हॅक्सीनविषयी अंतिम रिपोर्ट जूनमध्ये जारी करण्यात येईल.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी ट्विट करत आपला मुद्दा मांडला आहे. कोव्हॅक्सिन लशीच्या गुणवत्तेवर शंका व्यक्त केली होती. या लशीची चाचणी पूर्ण होत नाही, तो पर्यंत तिचा वापर टाळायला हवा,असे त्यांनी म्हटले होते.
दुसरे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी देखील भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लशीला मंजुरी देण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भारत बायोटेक ही प्रथम दजार्ची कंपनी आहे.
मात्र, या कंपनीच्या कोव्हॅक्सिन या लशीसाठी तिस ऱ्या टप्प्यातील चाचणीशी संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकृत प्रोटोकॉल दुरुस्त केला जात आहे ही आश्चयार्ची गोष्ट आहे.
जयराम रमेश आणि शशी थरुर यांनी कोव्हॅक्सिन लसीवर शंका घेतल्याने भारताच्या लसीकरण कार्यक्रमात अडथळा निर्माण झाला होता. अनेकांनी त्यांचे ऐकून लस घेण्याचे टाळले होते. व्हाईट हाऊसच्या प्रमुख डॉक्टरांनीच हा निर्वाळा दिल्याने कायम अमेरिकेकडे तोंड करून पाहणारे दोन्ही नेते चांगलेच तोंडावर पडले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App