विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने सोमवारी सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लसे दिली आहे. हा एक विक्रम ठरला आहे.Vaccinated more than five lakh people, Maharashtra’s record one day performance; Now it will reach the stage of one and a half crore
३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून राज्याने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. आज लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडला. त्यांबाद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले.
लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी राहिला आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले. त्यात आजची संख्या मिळविली तर सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या आसपास ही संख्या होत आहे.
उद्या (मंगळवारी)महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कैकपटीने महाराष्ट्र पुढे असून २६ एप्रिल रोजी राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक ६१५५ लसीकरण केंद्र होती.
त्यामध्ये ५३४७ शासकीय आणि ८०८ खासगी केंद्रांचा समावेश होता. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. लसीकरणाला वेग दिल्यास राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
राज्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App