साथी हाथ बढाना: ऑक्सिजनसाठी सुश्मिता सेनचा पुढाकार

विशेष प्रतिनिधी

मुंबई: भारत संकटात आहे. सर्वत्र हाहाकार सुरु आहे. कुणी ऑक्सिजन देता का? ऑक्सिजन!अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.मात्र या संकटात अनेक मदतीचे हात समोर येत आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी प्रत्येकजण आपपल्या परीने प्रयत्न करतंय. तर कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी अभिनेत्री सुश्मिता सेनने देखील पुढाकार घेतला.Sushmita Sen organises oxygen cylinders for Delhi hospital

कोरोना रूग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी सुश्मिता सेनने ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध करून दिले आहेत. सुश्मिताने केलेल्या या मदतीचं अनेकांनी कौतुक देखील  केलं आहे.

दिल्लीमध्ये ऑक्सिजनच्या समस्येबाबत सुश्मिताला ट्विटरच्या माध्यमातून समजलं. हे कळताच सुश्मिताने काही ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध करुनही दिले आहेत. दरम्यान यासंदर्भात सुश्मिताने मदतीसाठी ट्विट केलं. आपल्या ट्विटमध्ये ती म्हणते, “हे खरंच काळीज पिळवटून टाकणारं आहे. ऑक्सिजनची समस्या सगळीकडे भासतेय. मी काही ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध केलेत.

नुकताच दिल्लीतील एका डॉक्टरांचा रडतानाचा व्हिडिओ समोर आला होता त्यावर मदत म्हणून सुशने काही ऑक्सिजन सिलिंडर मुंबईहून थेट दिल्लीला पोहचवले.

सुश्मिताने काही वेळानंतर पुन्हा एक ट्विट केलं. ती म्हणते, “मी सांगत होते त्या दवाखान्यात ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आभार”.

Sushmita Sen organises oxygen cylinders for Delhi hospital

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात