
युनायटेड एअरलाईन्स या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हटवादीपणे कोरोना टेस्ट करून घेण्यास नकार दिला. दिल्ली विमानतळावर कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट करायला सांगितल्यावर त्यांनी कोणताही प्रवासी न घेता रिकामेच विमान न्यूयॉर्कला नेले. युनायटेड एअरलाईन्सने दिल्लीच्या आपल्या सर्व फेऱ्या रद्द केल्या अहेत.Asked to test the corona, they flew empty to New York
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : युनायटेड एअरलाईन्स या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हटवादीपणे कोरोना टेस्ट करून घेण्यास नकार दिला. दिल्ली विमानतळावर कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट करायला सांगितल्यावर त्यांनी कोणताही प्रवासी न घेता रिकामेच विमान न्यूयॉर्कला नेले.
युनायटेड एअरलाईन्सने दिल्लीच्या आपल्या सर्व फेऱ्या रद्द केल्या अहेत.युनायटेड एअरलाईन्सचे न्यूयॉर्क- दिल्ली विमान दिल्ली विमानतळावर उतरले होते. भारतातील नियमाप्रमाणे यातील कर्मचाऱ्याना अधिकाऱ्यानी आरटीपीसीआर करण्यास सांगितली.
याला कर्मचाºयांनी नकार दिला. मात्र, अधिकाºयांनी त्यासाठी आग्रह धरला. त्यावेळी चिडून जाऊन कर्मचारी विमानात गेले आणि विमान रिकामेच न्यूयॉर्कला घेऊन गेले.
युनायटेड एअरलाईन्सने प्रसिध्दीस दिलेल्या आपल्या निवदेनात म्हटले आहे
कीआम्हाला भारतातील प्रवासासाठी नक्की काय सूचना आहे याची स्पष्टता हवी आहे. तोपर्यंत आमची सेवा स्थगित करण्यात येत आहे. प्रवाशांना पर्याय कशा पध्दतीने उपलब्ध करून देता येईल याचा विचार आम्ही करत आहोत.
भारतामध्ये कोरोना वाढत असल्याने विमानतळावरील सर्वांची टेस्ट केली जातआहे. मात्र, जी विमाने रनवेवरूनच परत जातील त्यांच्या कर्मचाºयांना या नियमातून वगळण्यात येत आहे.
मात्र, युनायटेड एअरलाईन्सचे हे विमान दिल्लीमध्ये काही काळ थांबणार होते. त्यामुळे कर्मचारी विमानतळाबाहेर जाणार होते. त्यामुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्यांची टेस्ट करण्याचा आग्रह धरला होता.मात्र,त्यांनी हटवादीपणे हे ऐकले नाही.
Asked to test the corona, they flew empty to New York
महत्वाच्या बातम्या
Array