वृत्तसंस्था
पुणे : महापालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या वार्डस्तरीय निधीतून प्रत्येकी पाच लाख रूपये घेऊन शहरात दोन आॅक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येणार आहे़. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत एकमताने निर्णय घेतल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रासने यांनी दिली़. Will now set up two oxygen plants in Pune from ward level funds
नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधी सुमारे पाच कोटी रूपयांचा होतो आहे. त्यातून बाणेर येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटल येथे हे दोन ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत़ यामुळे भविष्यात शहरातील रूग्णालयांना आॅक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल़.
भांडवली खर्चात कपात
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेने आपल्या भांडवली खर्चांमध्ये ३५० कोटीच्या रक्कमेची कमी केली असून, हा निधी आवश्यकतेनुसार कोरोना आपत्ती निवारणासाठी खर्च केला जाणार आहे़ अंबिल ओढ्याची सीमाभिंत बांधण्यास मंजुरी
दरम्यान, स्थायी समितीच्या बैठकीत पीएमपीला दरमहा देण्यात येणारी संचलन तूट देण्याबरोबरच, अंबिल ओढ्याच्या सीमा भिंत बांधण्यास मान्यता दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App