वृत्तसंस्था
अहमदनगर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शहरात आरोग्यसेवा ग्रामीण भागाच्या तुलनेत चांगली म्हंटली जाते. कोरोनाने आता शहरी आणि ग्रामीण असा भेद मोडूनच काढला आहे. बेड, ऑक्सिजनची टंचाई असून रुग्णांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत एका आमदाराने 1100 बेडचे कोविड सेंटर उभारले आहे. मंत्री, खासदार, आमदार आणि नगरसेवकांसमोर त्यांनी सेंटर उभारून नवा आदर्श निर्माण केला आहे. MLA erected 1100 bed covid Center
आमदार निलेश लंके असे त्यांचे नाव आहे. विशेष म्हणजे पहिल्या लॉकडाऊनमध्ये त्यांनी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील कॉलेजमध्ये एक हजार बेडचे कोविड सेंटर उभे केले होते. तिथे भरती झालेले हजारो रुग्ण बरे होऊन घरीही परतले होते. रुग्णांना दिला जाणारा उत्कृष्ट आहार हा चर्चेचा विषय ठरला होता.
आता कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे निलेश लंके यांनी नगर कल्याण महामार्गावरील भाळवणी येथील मंगल कार्यालयामध्ये 1000 बेड आणि 100 ऑक्सिजन बेडचे कोरोना सेंटर उभे केले आहे. त्याचे नामकरण माननीय श्री शरद पवार कोविड सेंटर, असे केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App