विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : अमेरिकेने आता १६ वर्षांपुढील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत आतापर्यंत २१ कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली आहे.US will give vaccine under 16 year age peopels
गेल्या चोवीस तासात जगभरात ६.५७ लाख जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यादरम्यान ९८१३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.
काल अडीच लाखाहून अधिक नागरिकांना कोरोना झाला आहे. त्यानंतर तुर्कस्तान ५५,१४९, अमेरिका ५१,६५० आणि ब्राझील येथे ३४,६४२ जणांना बाधा झाली आहे. यानुसार भारतात गेल्या काही दिवसात तुर्कस्तान आणि अमेरिकेच्या तुलनेत पाच पट अधिक तर ब्राझीलपेक्षा सात पट अधिक रुग्ण सापडले आहेत.
भारतात कोरोनाची वाढती संख्या पाहता ब्रिटन, अमेरिकेबरोबरच पाकिस्तानने भारतातून येणाऱ्या नागरिकांना देशात बंदी घातली आहे. सुरवातीला ब्रिटनने भारताच्या नागरिकांवर बंदी घातली होती.
भारतातील वाढती रुग्णसंख्या पाहता ब्रिटनने भारतातील प्रवास हा रेड लिस्टमध्ये सामील केला आहे. पाकिस्तानने देखील भारतातून येणाऱ्या प्रवाशांना दोन आठवड्यासाठी बंदी घातली आहे. त्याचवेळी अमेरिकी प्रशासनाने भारतातील प्रवास टाळावा, असे आवाहन नागरिकांना केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App