ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या – दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज निधन झाले. चांगला चित्रपट कोणता, तो कसा पाहायचा हे त्यांच्याकडून शिकावे.
सिनेमा glamour, झगमगाट, fantasies दाखवतेच पण त्याही पेक्षा जेव्हा उत्कृष्ट आणि मनाला भावणारी कलाकृती बघायची असेल तेव्हा ज्या लोकांची नावे डोळ्यासमोर येतात त्यातलंच एक नाव म्हणजे सुमित्रा भावे आणि त्यांचे सिनेमे.
अस्तु, वास्तुपुरुष, बाधा, एक कप च्या, नितळ, संहिता आणि सध्याचा national award winning सिनेमा कासव हे आणि असे अनेक सिनेमे बघताना येते एक अनुभूती आ
एक कप च्या या सिनेमातून कोकणाच्या घरातील चुलीचा धूर आणि त्या मांजरीच्या आवाजापासून ते त्या एस.टीचे तिकीट काढतानाच्या टिकटिक आवाजापर्यंत प्रत्येक गोष्टी आपल्या मनात साठत जातात.
माणूस कितीही मोठा झाला गाव सुटलं तरी त्याची पाळे-मुळे ज्या गावाशी ज्या घराशी जोडलेली असतात तरी ती त्या व्यक्तीला परत तिथे खेचून आणतात आणि तिथूनच परत एक वेगळी कलाटणी देतात त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वास्तुपुरुष, तर शरीरापलीकडे जाऊन माणसाकडे बघायला लावणारा ‘नितळ प्रेम’ करायला शिकवणारा सिनेमा म्हणजे नितळ.
सिनेमा ही एक खिडकी आहे. संपूर्ण जगाकडे बघायची. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे संहिता आणि कासव. संहिता हा सिनेमा स्वतःच्या खिडकीतून समाजाकडे पहायला लावतो तर कासव हा सिनेमा समाजाच्या खिडकीतून स्वतःकडे पहायला लावतो. असे अनेक angle, frames, feelings आणि passion हे सुमित्रा भावे यांच्या सिनेमातून पाहायला मिळतात.
आज सुमित्रा भावे यांचे दुःखद निधन झाले. पण त्यांनी मराठी सिनेसृष्टीला दिलेले सगळे सिनेमे पाहून मी हे ठामपणे म्हणू शकते की चांगला सिनेमा कसा असतो आणि तो कसा पहायचा हे मला त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांनी शिकविले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App