Israel : कोरोना महामारीने जगभरात विनाश घडवलेला असताना इस्रायलमधून एक आनंदाची बातमी आली आहे. इस्रायलने आपल्या देशाने कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकल्याचे जाहीर केले आहे. एवढेच नाही, तर देशातील नागरिकांवर असलेले मास्क वापराचे बंधनही दूर केले आहे. तेथील नागरिक आता विनामास्क वावरू शकणार आहेत. इस्रायलने आपल्या लोकसंख्येच्या 80 टक्के नागरिकांचे लसीकरण केल्यानंतर ही घोषणा केली आहे. कोरोनाविरुद्धचे हे मोठे यश म्हणून इस्रायलच्या या कामगिरीकडे पाहिले जात आहे. Israel wins war against Corona, Now Citizens can roam without masks
वृत्तसंस्था
तेल अवीव : कोरोना महामारीने जगभरात विनाश घडवलेला असताना इस्रायलमधून एक आनंदाची बातमी आली आहे. इस्रायलने आपल्या देशाने कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकल्याचे जाहीर केले आहे. एवढेच नाही, तर देशातील नागरिकांवर असलेले मास्क वापराचे बंधनही दूर केले आहे. तेथील नागरिक आता विनामास्क वावरू शकणार आहेत. इस्रायलने आपल्या लोकसंख्येच्या 80 टक्के नागरिकांचे लसीकरण केल्यानंतर ही घोषणा केली आहे. कोरोनाविरुद्धचे हे मोठे यश म्हणून इस्रायलच्या या कामगिरीकडे पाहिले जात आहे.
इस्रायलचे आरोग्यमंत्री युली इडेलस्टाईन यांनी गुरुवारी म्हटले की, लसीकरण सुरू झाल्यापासून इस्रायलमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे आता निर्बंध शिथिल करणे शक्य झाले आहे. तथापि, ऑफिसमध्ये अद्यापही मास्क घालणे अनिवार्य असेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इस्रायलने आतापर्यंत 93 लाख लोकसंख्येपैकी 50 लाख नागरिकांपेक्षा जास्त जणांचे लसीकरण पूर्ण केले आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या आणि लसीमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी फायझरला मेडिकल डेटा शेअर करण्याच्या अटीवर मोठ्या प्रमाणात कोरोना लसीचे डोस मिळवले होते. इस्रायलने फायजरला लसीच्या प्रभावाचा डेटा शेअर केला आहे.
कोरोनाविरुद्ध लसीकरणाला सुरुवात होताच इस्रायलच्या परिस्थितीत मोठा बदल होत गेला. जानेवारीच्या मध्यात इस्रायलमध्ये दररोज 10,000 नवीन रुग्ण आढळत होते, आता दररोज केवळ 200 रुग्णांवर ही आकडेवारी आली आहे. इस्रायलने अनेक निर्बंध शिथिल केले, आता लोकांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण खूपच कमी राहिले आहे. तथापि, जगातील इतर देशांकडून येणाऱ्या लोकांवर अद्यापही कडक प्रतिबंध आहेत. या छोट्या देशाने अतिशय कमी वेळात आपल्या लोकसंख्येच्या मोठ्या भागाला लसीकरण करून कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकली आहे.
Israel wins war against Corona, Now Citizens can roam without masks
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App