30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई

Aurangbad Commissioner warns citizens above 45 years to vaccination before April 30th

Aurangbad Commissioner : राज्यात सध्या कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. मुंबई, नागपूर, पुणे या महानगरांतील कोरोना रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. याच जोडीला लसीकरण अभियानही जोरदार सुरू आहे. तथापि, लसीकरणाला नागरिकांचा तितकासा प्रतिसाद दिसत नाहीये. यामुळेच आता औरंगाबाद मनपा प्रशासकांनी लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांना 30 एप्रिलनंतर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. Aurangbad Commissioner warns citizens above 45 years to vaccination before April 30th


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : राज्यात सध्या कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. मुंबई, नागपूर, पुणे या महानगरांतील कोरोना रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. याच जोडीला लसीकरण अभियानही जोरदार सुरू आहे. तथापि, लसीकरणाला नागरिकांचा तितकासा प्रतिसाद दिसत नाहीये. यामुळेच आता औरंगाबाद मनपा प्रशासकांनी लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांना 30 एप्रिलनंतर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.

राज्यातील इतर शहरांप्रमाणेच औरंगाबादेतही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. संचारबंदीचे येथेही पालन केले जात आहे. व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे निर्बंधांतून सूट देण्याची वारंवार मागणी केली आहे. परंतु व्यापाऱ्यांना लस न घेता दुकाने उघडण्यास परवानगीच नसल्याचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी स्पष्ट केले आहे.

30 एप्रिलनंतर लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याने त्यांची चौकाचौकांत कोरोना टेस्ट केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी 12 पथके तैनात करण्यात आली आहेत.

Aurangbad Commissioner warns citizens above 45 years to vaccination before April 30th

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात