विशेष प्रतिनिधी
कोलकता : विषाणू संसर्ग होणे हा काही गुन्हा आहे असे मला म्हणायचे नाही, पण दिल्लीतील भाजप नेते बेपर्वाईने बंगालच्या बाहेरील नेत्यांना चाचण्या न करता प्रचारासाठी आणत आहेत. हेच राज्यातील रुग्णसंख्या वाढण्यास कारणीभूत ठरत आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.Mamtadidi attack on BJP and election commission
हावडा जिल्ह्यातील भाजपच्या एका उमेदवाराने कोरोना संसर्ग झाला असूनही प्रचार केला, असा दावा करून ममता म्हणाल्या की, तो घरी का बसला नाही? त्याने प्रचार करणे का टाळले नाही ? आमचा पक्ष असा धोका कधीही पत्करत नाही.निवडणूक आयोगालाही त्यांनी धारेवर धरले.
शेवटच्या तीन टप्प्यांतील मतदान एकाच वेळी घेण्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून प्रचाराचे आपले पाच दिवस मात्र कमी करण्यात आले. परिणामी आपल्याला २० सभा दक्षिण बंगालमधील २० सभा घेता येणार नाहीत. अन्नपूर्णा पूजा, बसंती पूजा, रामनवमी आणि रमजान अशा विविध सणांबद्दल मात्र त्यांनी शुभेच्छा देऊन ममता यांनी चंडी श्लोकांचे पठण केले. त्यानंतर त्यांनी मुस्लीम नागरीकांनाही शुभेच्छा दिल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App