विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – चीनच्या वाढत्या आक्रमकतेविरोधात चीन-अमेरिका एकत्र असल्याचा इशारा दोन्ही देशांनी दिला आहे. जागतिक स्तरावर ही महत्वाची घडामोड मानली जाते. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली. बायडेन यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून प्रथमच एखाद्या राष्ट्रप्रमुखाची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली आहे. USA and Japan unites against China
जपानने आतापर्यंत शेजाऱ्यांशी शांततेचे धोरण स्वीकारले होते. मात्र, सुगा यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हा देश आक्रमक झाला असून त्यांनी चीनला उघड विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
चीनचे वाढते लष्करी आणि आर्थिक सामर्थ्य, त्याबळावर त्यांनी स्वीकारलेले आक्रमक धोरण यावर दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सुगा यांनी चीनला थेट इशारा दिला.
‘हिंदी-प्रशांत सागरात अनावश्यसक वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नांना आळा घातला जाईल. यासाठी जपान आणि अमेरिका संयुक्तपणे प्रयत्न करतील. या भागातील शांतता आणि स्थैर्य बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष निर्माण होऊ शकतो,’ असा इशारा सुगा यांनी दिला. बायडेन यांच्याबरोबरील चर्चेत सुगा यांनी तैवानमधील अशांततेचा मुद्दाही उपस्थित केला. तैवानच्या मुद्यावर जपानने १९६९ नंतर प्रथमच जाहीरपणे वक्तव्य केले आहे.
महत्वाच्या बातम्या वाचा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App