बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते.
पंगा गर्ल महाराष्ट्र सरकारसोबत नेहमीच पंगा घेत असते. Kangana Ranaut Vs Maharashtra Government on Lockdown
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. कंगना बर्याचदा सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारबद्दल वक्तव्य करत असते. तीने महाविकास आघाडी सरकारला चंगु-मंगु असे संबोधले होते .या वेळी आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारबद्दल ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार मुंबईतील कंगनाच्या कार्यालयातील बरेच अनधिकृत बांधकामाची तोडफोड करण्यात आली होती. ज्यानंतर अभिनेत्री सतत उद्धव सरकारवर कडक टीका करत असते.
कंगना रनौतने ट्विटवर एका दरवाजाचा फोटो शेअर केला आहे. हा दरवाजा समोरून बंद आहे. परंतु, हा दरवाजा सर्व बाजूंनी खुला आहे. हा दरवाजाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “महाराष्ट्र लॉकडाऊन असा आहे”. ज्यानंतर अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आली आहे.
Meanwhile….. pic.twitter.com/uoyiERkDx7 — Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) April 16, 2021
Meanwhile….. pic.twitter.com/uoyiERkDx7
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) April 16, 2021
‘महाराष्ट्रात कोरोनाचे प्रकरण वाढतच चालले आहेत. ज्यामुळे राज्य सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन लादला आहे.
Can anyone tell me if Maharashtra has a lockdown? Semi lockdown ? Fluid or fake lockdown? What is going on here? No one seems to be wanting to make decisive decisions. Changu Mangu gang fighting with existential crisis To be or not to be while every moment hanging like a sword. — Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) April 12, 2021
Can anyone tell me if Maharashtra has a lockdown? Semi lockdown ? Fluid or fake lockdown? What is going on here? No one seems to be wanting to make decisive decisions. Changu Mangu gang fighting with existential crisis To be or not to be while every moment hanging like a sword.
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) April 12, 2021
जिथे या संपूर्ण लॉकडाऊनला राज्यात अतिशय मिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. बरेच लोक त्याचे योग्यरित्या अनुसरण करत आहेत, तर काही लोक अजूनही रस्त्यावर फिरत आहेत.
लॉकडाऊनबद्दल बोलताना कंगना म्हणाली, ‘निर्णायक निर्णय झाला पाहिजे. चंगू मंगू यांचं अस्तिस्व सध्या संकटात आहे..’ कंगनाच्या अशा वक्तव्यामुळे ती सध्या जोरदार चर्चेत आहे. सांगायचं झालं तर सोशल मीडियावर कंगनाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टवर नेटकरी प्रतिक्रिया देत असतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App