वृत्तसंस्था
पुणे : पुण्यामध्ये कोरोनाविरोधी लसींचा तुटवडा निर्माण झाला असून दीड ते दोन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे. Corona vaccine shortage in Pune again.
शहरात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे लसीकरण वाढवण्याची मागणी केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र पुरेशा लसी उपलब्ध होतच नाहीत. त्यामुळे नागरिक चिंतेत पडले आहेत. शहरातले लसीकरण पाहता या लसी दीड दिवस पुरतील. मात्र नव्या साठ्याबाबत काहीही माहिती नाही. त्यामुळे अनेक केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली.
नवी केंद्र सुरु करायची कशी ? शहरात १६० लसीकरण केंद्र सुरु आहेत. नवी केंद्र सुरु करण्यास खासगी रुग्णालय तयार आहेत. महापालिकेच्या नव्या जागा तयार आहेत. पण लस नसेल तर केंद्र सुरु करायची कशी ?असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App