विशेष प्रतिनिधी
हरिद्वार : महानिर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्विर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे गुरुवारी जाहीर करण्यात आले. कुंभमेळ्यात सहभागी होण्यास ते मध्य प्रदेशमधून हरिद्वारला आले होते.Great saint Kapil dev died due to corona
कपिल देव यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर डेहराडूनच्या कैलास रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, कुंभच्या काळात कोरोना संसर्गाने मृत्यू पावलेले कपिल देव हे पहिले मोठे संत आहेत.कपिल देव यांचे त्यांच्या निधनाने आणि कुंभतील पॉझिटिव्ह भाविकांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच दिवसांत हरिद्वार ते देवप्रयाग पट्ट्यात भाविक व साधू-संतांच्या अशा दोन लाख ३६ हजार ७५१ चाचण्या केल्या. त्यापैकी एक हजार ७०१ पॉझिटिव्ह आढळले. अजून काही आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
कुंभमेळ्यात पाच दिवसांत एक हजार ७०१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज १०० भाविक आणि २० संतांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. लाखोंच्या संख्येने लोक कुंभमेळ्यात सहभागी होत असल्याने कोरोनारुग्णांची संख्या वेगाने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App