औरंगाबाद : नभरंग प्रतिष्ठान कलेचे व्यासपीठच्या वतीने रसिक प्रेक्षकांसाठी 10 दिवस ऑनलाईन गीतरामायण (Online Geet Ramayan) ची मेजवानी असणार आहे. कोरोना संकटात घरात बसून लोकांचे मनोरंजन करण्याच्या दृष्टीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. गुढीपाडवा ते रामनवमी या दहा दिवसांत रंगणाऱ्या या सोहळ्यासाठी द फोकस इंडिया मीडिया पार्टनर आहेत.
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातच थांबावे आणि घरी असताना त्यांचेस मनोरंजन व्हावे या उद्देशानं नभरंग प्रतिष्ठान कलेचं व्यासपीठतर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून यंदा गुढीपाडवा ते रामनवमी या काळामध्ये गीत रामायण गायनाचा ऑनलाईन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुगल मीटच्या माध्यमातून हा ऑनलाईन सोहळा आयोजित करण्यात येणारेय. गुढीपाडव्याला म्हणजे 13 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल. तर 13 एप्रिल 2021 ते 21 एप्रिल 2021 पर्यंत दररोज रात्री 9 वाजता रसिकांना ऑनलाईन गीत रामायण गायनाचा आस्वाद घेता येईल. फोकस इंडियाच्या यूट्यूब चॅनलवरची तुम्हाला याचा आस्वाद घेता येईल.
नभरंग प्रतिष्ठान कलेचे व्यासपीठच्या सभासदांनी गेल्या लॉकडाऊनमध्येही लोकांचे मनोरंजन व्हावे म्हणून अनेक online उपक्रम राबवले. विविध विषयावर कथाकथन, नाट्य अभिवाचन, काव्य वाचन तसेच गाण्याच कार्यक्रम याचा त्यात समावेश होता. दर रविवारी सायंकाळी अशा पद्धतीने ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केले जातात.
ही संकल्पना नाट्य व चित्रपट दिग्ददर्शक श्रीपाद पदे यांची आहे. लोकांना रोजच्या घडामोडीतून बदल हवा असतो. इंटरनेटमुळं सारं जग जवळ आलं आहे. कोरोनाच्या काळात लोकांनी घरात बसून कला जोपासावी, व रसिकांना त्याचा आस्वाद मिळावा यासाठी ही कल्पना सुचली व त्यातून नभरंग समूह सुरू झाल्याचं ते सांगतात. आतापर्यंत असे 40 कार्यक्रम त्यांनी केले आहेत. या उपक्रमाला प्रवीण रायबागकर, प्रसाद पालव, वैशाली घाडगे, स्वाती देशपांडे, उषा जोशी, अमिता लेकुरवाळे, अॅड. उल्हास सावजी, अनुराधा पिंगळीकर, पल्ल्वी प्रसन्न, सुषमा थिटे यासह अनेक कलाकारांनी मदत केल्याचं त्यांनी सांगितलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App