वृत्तसंस्था
नवी दिल्ली – कुचबिहारमध्ये निवडणूक हिंसाचार झाला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये केंद्रीय सुरक्षा दलांना घेरण्याचा प्रयत्न झाला. आता केंद्र सरकारने पुढील ४ टप्प्यांतील मतदानादरम्यान हिंसाचार टाळण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जादा तुकड्या बंगालमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. Additional central forces to be deployed in Bengal after violence in Cooch Behar
नव्या निर्णयानुसार बीएसएफच्या ३३ तुकड्या, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १२ तुकड्या, इंडो – तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या १३ तुकड्या, सशस्त्र सीमा सुरक्षा दलाच्या ९ तुकड्या, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ४ तुकड्या बंगालमध्ये पुढच्या ४ टप्प्यातील मतदानादरम्यान तैनात करण्यात येतील.
सुरक्षेसंबंधी राजकीय वादापलिकडचा हा निर्णय आहे. हा केवळ दोन राजकीय गटांमधला संघर्ष घडलेला नाही तर सुरक्षा दलाच्या जवानांना जमावाने घेरण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे सुरक्षासंबंधी फेरआढावा घेऊन जादा कुमक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय दलाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
पश्चिम बंगालमध्ये आज होत असलेल्या मतदानाच्या चौथ्या टप्प्यात कुचबिहारमध्ये झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोपांची प्रचंड धुमश्चक्री सुरू झाली असून कूचबिहारचा गोळीबार पूर्वनियोजित होता. गृहमंत्री अमित शहांच्या निर्देशावर कट रचण्यात आला असल्याचा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला, तर ममतांच्याच केंद्रीय दलांना घेरण्याच्या आवाहनामुळे हा हिंसाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.
Additional companies of CAPF to be inducted in West Bengal with immediate effect. 33 companies of BSF, 12 companies of CRPF,13 companies of ITBP,9 companies of SSB & 4 companies of CISF will be deployed. Total 71 companies will be deployed. — ANI (@ANI) April 10, 2021
Additional companies of CAPF to be inducted in West Bengal with immediate effect. 33 companies of BSF, 12 companies of CRPF,13 companies of ITBP,9 companies of SSB & 4 companies of CISF will be deployed. Total 71 companies will be deployed.
— ANI (@ANI) April 10, 2021
राजकीय वादाची धुमश्चक्री
तत्पूर्वी, कुचबिहारमध्ये झालेल्या हिंसाचारावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये राजकीय वादाची धुमश्चक्री उडाली होती. त्याचे पडसाद आजही उमटणे अपेक्षित आहे. ममता बॅनर्जी आज कुचबिहारमध्ये येणार आहेत.
कुचबिहारच्या सीताकुचली भागात झालेल्या गोळीबाराला अमित शहा हेच जबाबदार आहेत. नव्हे, त्यांनीच हा कट रचला. मी केंद्रीय दलांना दोष देत नाही कारण ते गृहमंत्र्यांच्या आदेशाखाली काम करतात. मला खात्री आहे, की कुचबिहारमधील गोळीबाराची घटना ही पूर्वनियोजित होती. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. आम्ही गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, असे ममता बॅनर्जी यांनी काल स्पष्ट केले होते.
याच प्रकरणावरून भाजपच्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी यांनी तृणमूळ काँग्रेसच्या केडरला केंद्रीय सुरक्षा दलांचा घेराव करण्याची चिथावणी दिली म्हणूनच कुचबिहारची गोळीबाराची घटना घडली असल्याचे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे चौकशी करून या घटनेचा अहवाल थेट दिल्लीला मागून घेतला आहे. वेळ पडल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाचे विशेष निरीक्षक आज कुचबिहारमध्ये घटनास्थळाला भेट देऊन प्रत्यक्ष माहिती घेण्याचीही शक्यता आहे.
हे ही वाचा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App