विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोनावर मात करुन घरी परतला आहे. 27 मार्चला सचिनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार सावधगिरीचा उपाय म्हणून सचिन हॉस्पिटलमध्ये भरती झाला होता. आज सचिन तेंडुलकरला डिस्चार्ज देण्यात आला आहे. Sachin Tendulkar got discharged from hospital after successfully recover from corona informed by tweet
याबाबत केलेल्या ट्विटमध्ये सचिनने म्हटले आहे की, दवाखान्यातून आताच घरी आलो आहे. पण सध्या विलगीकरणात राहणार असून विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
pic.twitter.com/h3gLviUblI — Sachin Tendulkar (@sachin_rt) April 8, 2021
pic.twitter.com/h3gLviUblI
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 8, 2021
माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर त्याने पुढे म्हटले आहे की, मी सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. ज्यांनी माझी काळजी घेतली. ते खूप कठिण परिस्थितीत आपली सेवा बजावत असल्याचे सचिन म्हणाला.
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचीही ट्विटरवरुन दिली होती माहिती सचिनने २७ मार्च रोजी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे ट्विट करत सांगितले होते. त्याने ट्विटमध्ये म्हटले होते, ‘माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी मागील काही काळापासून सतत चाचण्या करत होतो. काही सौम्य लक्षणे आढळल्याने मी स्वतःला घरातच क्वारंटाईन करून घेतले आहे. माझ्या कुटुंबातील इतर कोणालाही या आजाराची लागण झाली नाही.’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App