मुख्यमंत्र्यांपासून राज्याचे विविध मंत्री मुंबईतील स्थिती सुधारत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मुंबईत चीनी व्हायरसमुळे भयानक अवस्था असल्याचे समोर येत आहे. केईएम या मोठ्या हॉस्पीटलमध्ये शवगृहाची क्षमता २४ आहे, मात्र येथे ३७ मृतदेह आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन मुंबई महापालिकेच्या कारभाराचा निषेध केला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्र्यांपासून राज्याचे विविध मंत्री मुंबईतील स्थिती सुधारत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मुंबईत चीनी व्हायरसमुळे भयानक अवस्था असल्याचे समोर येत आहे. केईएम या मोठ्या हॉस्पीटलमध्ये शवगृहाची क्षमता २४ आहे, मात्र येथे ३७ मृतदेह आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत मुंबई महापालिकेच्या कारभाराचा निषेध केला आहे.
केईएम रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्या कक्षाबाहेर घोषणाबाजी केली. पीपीई किट मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी केली होती. येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचाच पुरेशी सुरक्षा साधने नसल्याने मृत्यू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्येही संताप आहे.
येथील शवगृहात मृतदेह ठेवण्यास जागा नाही. त्यामुळे वॉर्डात खुल्या पद्धतीने स्ट्रेचरवर मृतदेह ठेवल्याची घटना आज उघडकीस आली. केईएमच्या शवगृहात २४ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. सध्या केईएमध्ये ३७ शव आहेत. त्यामुळे काही मृतदेह शवागृहाबाहेर ठेवल्याचे सांगण्यात आले. शवगृहातील ७ कर्मचाऱ्यांना चीनी व्हायरसची लागण झाली आहे.
चीनी व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या मुंबईत वाढल्याने अंत्यसंसकाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कारास ५ ते १० तासांचा विलंब होत आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यानी केला आहे. कोरोना मृत्यूंची संख्या मुंबईत हजाराहून अधिक झाली आहे. एका महिन्यानी ही स्थिती अजून गंभीर होईल, त्या वेळी महापालिका प्रशासन काय करणार, असा सवाल सोमय्या यांनी केला. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. राज्यातही शिवसेनेचे सरकार आहे. मात्र, दोन्हींमध्ये समन्वय नसल्याचेही उघड झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App