विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर: गोकुळ दूध संघ निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीनं महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. गोकुळवर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची सत्ता आली आहे. समविचारी आघाडीने 13 जागा जिंकल्या आहेत. तर, 12 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे. Satej Patil
एकूण 25 संचालकांच्या जागांसाठी 50 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 99.88 टक्के मतदान पार पडलं. जवळपास 5 हजार 416 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, जिल्ह्यातील महायुतीचे आमदार आणि समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली.
ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. सुरुवातील महायुतीच्या पॅनलं आघाडी घेतली होती. मात्र, सतेज पाटलांच्या पॅनलनं मुंसडी मारत मतमोजणीत आघाडी घेतली. सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीचे 13 उमेदवार विजयी ठरले.
सतेज पाटील मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून बसले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निकाल जाहीर करण्यासाठी मुद्दाम उशिरा केला जात आहे, असा आरोप सतेज पाटलांनी केला. पॅनलनं आघाडी घेताच सतेज पाटलांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
गोकुळच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. महायुतीच्या नेत्या शौमिका महाडिक, माजी अध्यक्ष नावेद मुश्रीफ, अरुण डोंगळे, विश्वास पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. शौमिका महाडिकांकडून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. मात्र, फेर मतमोजणीतही शौमिका महाडिकांचा पराभव झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App