विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्यात खासगी वाहनांवर ‘पोलीस’, ‘महाराष्ट्र पोलीस’ अशी अक्षरे, पोलीस किंवा लाल रंगाच्या नावाच्या पाट्या लावून फिरणाऱ्यांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सर्व विभागांना कारवाईचे निर्देश दिले आहेत.
‘आरटीओ’ला अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच इतर नागरिक त्यांच्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ किंवा लाल पाटीचा वापर करत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. यानंतर ‘आरटीओ’ने केलेल्या तपासणीत काहीजण अशा फलकांचा वापर करून अनावश्यक प्रभाव निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना(आरटीओ) अशा वाहनांची नोंद घेऊन मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाईचे निर्देश दिले आहेत. मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांना विशेष मोहिमा राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, सरकारी वाहनांना लागू असलेली ओळख खासगी वाहनांवर वापरणे नियमबाह्य आहे. त्यामुळे वाहनधारकांनी ‘पोलीस’, ‘महाराष्ट्र शासन’ किंवा लाल पाट्या आणि स्टिकर्स तातडीने काढून टाकावेत. नियमभंग केल्यास संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App