महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 24 तास महत्त्वाचे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. काही धरणे ओव्हरफ्लो झाली असून नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांसाठी राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. heavy rainfall

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच अमरावती, अकोला, वाशिम, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या मान्सून सक्रिय असून कमी दाबाचा पट्टा देशाच्या मध्यभागातून पूर्वोत्तर भारतापर्यंत विस्तारला आहे. तसेच गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.



दरम्यान, 2 ते 4 ऑगस्ट दरम्यान देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 3 ते 7 ऑगस्ट या कालावधीत हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशात, तर 2 ते 7 ऑगस्ट दरम्यान उत्तर प्रदेशातही जोरदार पावसाची शक्यता आहे. आज पश्चिम राजस्थानातील काही भागांतही मुसळधार पाऊस पडू शकतो.

जळगाव जिल्ह्यात सतर्कता वाढवली

संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात नागपूरहून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. या पथकात चार अधिकारी आणि 30 जवानांचा समावेश असून त्यात दोन महिला जवानही आहेत. गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.

सततच्या पावसामुळे अमळनेर आणि पारोळा तालुक्यात दुर्दैवी घटना घडल्या आहेत. एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला असून पुराच्या पाण्यात वाहून गेलेले तीन जण बेपत्ता आहेत.

दरम्यान, उजनी धरणातून 80 हजार क्युसेक आणि वीर धरणातून 63 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

India meteorological department has issued heavy rainfall

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात