विशेष प्रतिनिधी
मुंबई: Vinayak Raut ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांची सून गिरीजा राऊत यांनी पती गीतेश आणि सासरे विनायक राऊत यांच्यासह कुटुंबातील ७ जणांवर कौटुंबिक छळ आणि जादूटोणा केल्याचा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयाने राऊत कुटुंबाचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे सध्या त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर संरक्षण नसून, पोलिसांकडून त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई केली जाऊ शकते.Vinayak Raut
सुनावणीआधीच अटकेची टांगती तलवार
विनायक राऊत यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता २३ जुलै रोजी मुख्य सुनावणी पार पडणार आहे. मात्र, तोपर्यंत त्यांना कोणताही तात्पुरता दिलासा देण्यास कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे ठाणे पोलिस या प्रकरणी सखोल चौकशीसाठी राऊत यांना केव्हाही ताब्यात घेऊ शकतात. विशेष म्हणजे, याच प्रकरणाशी जोडलेल्या अघोरी कृत्य आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत पोलिसांनी फिरोज शेख नावाच्या एका भोंदूबाबाला आधीच बेड्या ठोकल्या असून तो सध्या कोठडीत आहे.Vinayak Raut
सून गिरीजा राऊत यांचे गंभीर आरोप
गिरीजा राऊत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पती गीतेशवर अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतर ऊटीला हनिमूनला गेल्यावर पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला आणि शारीरिक संबंधांपेक्षा ‘मेंटल कनेक्शन’ महत्त्वाचे असल्याचे सांगून टाळाटाळ केली. त्यानंतर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता, ‘मला हात लावशील तर विधवा होशील’ अशी धमकी देत पतीने बेदम मारहाण केल्याचा दावा गिरीजा यांनी केला आहे. पालीच्या मंदिरात दर्शनाला जातानाही सर्वांसमोर गलिच्छ भाषेत अपमानित केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. पती शारीरिक संबंध ठेवण्यास अक्षम असल्यानेच कुटुंबाने आपल्यावर जादूटोणा आणि अघोरी उपाय केल्याचा खळबळजनक आरोप गिरीजा यांनी केला आहे.
राऊतांचा पलटवार, १२ कोटींची खंडणी मागितल्याचा दावा
सुनेने केलेले जादूटोणा आणि छळाचे हे सर्व आरोप विनायक राऊत यांनी सपशेल फेटाळून लावले आहेत. गिरीजा आणि माझा मुलगा गीतेश गेल्या तीन वर्षांपासून वेगळे राहत असून त्यांच्या घटस्फोटाची केस आधीपासूनच न्यायालयात सुरू आहे. २०१८ मध्ये घडलेल्या कथित घटनांची तक्रार आता २०२६ मध्ये का केली जात आहे? असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी यामागे मोठे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. राऊत यांनी दावा केला आहे की, गिरीजा हिने दरमहा ५ लाख रुपये देखभाल खर्च, १० कोटी रुपये रोख आणि मानसिक त्रासापोटी २ कोटी रुपये अशी तब्बल १२ कोटींची मागणी केली होती. यासोबतच ५ रूमचा मोठा फ्लॅट आणि एक ऑटोमॅटिक गाडीही तिला हवी होती. या अवाढव्य मागण्या आम्ही पूर्ण केल्या नाहीत, म्हणूनच तिने आकसापोटी हे खोटे आरोप करत तक्रार दाखल केली आहे. आमचा कोणत्याही अघोरी पंथाशी संबंध नाही, असेही विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App