विशेष प्रतिनिधी
नाशिक : सध्या मुंबई, कोकण, पुणे, नाशिक या भागात तुफान पाऊस सुरू आहे. मुंबईत तर जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यात ढगफुटी होण्याची शक्यता वर्तविली. हीच बाब लक्षात घेऊन नाशिक जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. ढगफुटी झालीच तर बचावकार्य करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. तसेच खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या तयारी विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन केले. Cloudburst
5 तालुक्यांतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
भारतीय हवामान खात्याने (IMD) नाशिकमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, दिंडोरीसह ग्रामीण भागात ही अतिवृष्टी होऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी या 5 तालुक्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच या भागातील आठवडे बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
सप्तशृंगी मंदिरही उद्या बंद राहणार
तसेच, शेतकऱ्यांनी उद्या शेतात जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान उद्या बंद ठेवण्यात येणार आहे. सप्तशृंगी परिसरातही अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सप्तशृंगी मंदिरही उद्या बंद राहणार आहे. पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा यासाठी प्रशासनाच्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. जेसीबी, पोकलेन आणि इतर यंत्रसामग्री सज्ज ठेवली आहे. गरज भासल्यास मदतीसाठी लष्करालाही सतर्क करण्यात आले आहे.
आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे
दरम्यान, नाशिकमधील संभाव्य ढगफुटी लक्षात घेता तेथील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. तसेच फारच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, अशी सूचना केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App