राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात ८ आरोपींच्या अटकेनंतर चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे; पण आत्ताच का स्वीकारली नैतिक जबाबदारी??

नाशिक : अयोध्येतल्या श्रीराम मंदिरातल्या देणगी चोरी प्रकरण ८ आरोपींना अटक झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि त्यांचे सहकारी अनिल मिश्रा यांनी आज राजीनामे दिले. श्रीराम मंदिरातील देणगी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तब्बल २५ दिवसांनंतर चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारली. मात्र या २५ दिवसांमध्ये हे दोघेही राम मंदिर परिसरातच राहात होते.

अयोध्यातल्या श्रीराम मंदिरातल्या देणगी चोरी प्रकरणात अनेक गंभीर खुलासे झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमने या चोरी प्रकरणाचा सगळा कच्चा चिठ्ठा खोलला. त्याचवेळी राम मंदिरातल्या सगळ्या व्यवस्थेसंदर्भातल्या उणिवा आणि त्रुटींचा सुद्धा गंभीर खुलासा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वासातले राम मंदिर निर्माणाचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांनी या संदर्भात सविस्तर मुलाखती दिल्या. त्यामध्ये त्यांनी चंपत राय यांच्या निष्ठेवर शंका घेतली नाही पण त्यांच्या कार्यशैलीवर आणि कार्यशैलीतल्या त्रुटींवर नेमकेपणाने बोट ठेवले होते. राम मंदिरातील व्यवस्थापनात अधिकाऱ्यांची क्रमवारी नव्हती. जबाबदारीची निश्चिती नव्हती. फक्त विश्वासावर स्वयंसेवकांच्या आधारे काम चालू होते. यामध्ये कार्यात्मक व्यावसायिकतेचा अभाव होता, याकडे नृपेंद्र मिश्रा यांनी लक्ष वेधले होते.



आधीच राजीनामे होते अपेक्षित

खरंतर यातून व्यवस्थित “संदेश” घेऊन चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी आधीच राजीनामा देणे अपेक्षित होते. कारण नृपेंद्र मिश्रा यांच्यासारखे पंतप्रधानांचे एवढे निकटवर्ती अधिकारी जाहीरपणे बोलत असतील, तर पंतप्रधानांना आपण राम मंदिर ट्रस्टच्या कुठल्याही पदावर राहणे अपेक्षित नाही हे चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या लक्षात आल्याशिवाय राहिले नसेल, तरीसुद्धा त्यांनी योग्य वेळेत राजीनामे दिले नाहीत. याच दरम्यान पंतप्रधान कार्यालयाने राम मंदिर ट्रस्ट कडे काही हिशेब मागितल्याची बातमी आली. पण त्यावेळी राम मंदिरातल्या देणगीच्या चोरी संदर्भात उत्तर प्रदेश मधली स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम चौकशी आणि तपास करत असल्याचे कारण सांगून चंपत राय यांनी पंतप्रधान कार्यालयाला हिशेब देण्याचे नाकारल्याची सुद्धा बातमी आली होती.

दबावानंतर राजीनामे

पण स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमच्या अहवालाच्या आधारे काल ८ आरोपींनी विरोधात एफआयआर दाखल झाले. त्यांचे कायदेशीर तपशील देखील जाहीर झाले. त्यानंतर पोलिसांनी काल रात्री उशिरा ८ आरोपींना अटक केली. यामध्ये चंपत राय आणि अनिल मिश्रा मिश्रा यांच्या निकटवर्ती यांचा समावेश राहिला. मात्र एफआयआर मध्ये चंपत राय आणि अनिल मिश्रा यांची नावे नव्हती. पण काल रात्री उशिरा आठ आरोपींना अटक झाल्यानंतर आज दुपारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना या चोरी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारणे भाग पडले. त्यामुळे चोरी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून दोघांनी राजीनामे दिले. या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि विश्व हिंदू परिषदेने कठोर भूमिका घेऊन चौकशी आणि तपास वेगाने पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. त्याचवेळी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्यावर राजीनामे देण्यासाठी दबाव वाढविला. खरं म्हणजे या दबावापोटीच दोघांनी राजीनामे दिले.

Champat Rai resigns as Ram Mandir Trust general secretary amid donation theft controversy

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात