
- लॉकडाऊन पूर्व स्थितीला वीज व इंधन वापर येतेय
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात वीजेची मागणी वाढतीय. हळू हळू कोरोना लॉकडाऊनमधून बाहेर येऊन देशभर उद्योग व्यवसाय सुरू झाल्याचे हे सूचिन्ह मानण्यात येत आहे. व्यवसायिक दराच्या वीज वापराचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
२३ मे रोजी १६० गिगावॉट वीजेची मागणी नोंदविली गेली. ती गेल्या वर्षीच्या त्याच दिवसाच्या मागणी एवढी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कारखाने, रेल्वे सेवा, विमान सेवा सुरू होत आहेत. रस्त्यांवर खासगी गाड्या धावत आहेत. जनजीवन सामान्य होत आहे. या स्थितीत वीजेची मागणी आणि इंधनाची मागणी ही लॉकडाऊन पूर्व स्थितीला येऊन पोहोचत आहे, असे दोन्ही आकडेवारी वरून दिसते.
देशाच्या आर्थिक हालचालीच्या मोजमापाची ही कसोटी आहे.
देशाच्या वीज वितरण कंपन्यांची शिखर संस्था पॉसोको ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी २३ मे रोजी वीजेची मागणी ४०७० दशलक्ष युनिट होती. ती यंदा याच दिवशी ३६६९ दशलक्ष युनिट होती. हा साधारण ४०० दशलक्ष युनिटचा फरक लॉकडाऊन लागू असल्याचा परिणाम मानला जातो.
तरीही वाढता उन्हाळा आणि कारखाने, उद्योग, व्यवसाय सुरू होणे या देन कारणांमुळे वीजेचा वापर आणि मागणी वाढल्याचे दिसते. एप्रिल महिन्यातील मागणीपेक्षा मे महिन्यातीस वीजेची मागणी १४% वाढल्याची दिसते, असे पॉसेकोच्या प्रवक्त्याने सांगितले.
फ्रान्समधील इंटरनँशनल एनर्जी एजन्सीच्या आकडेवारीनुसार भारतातील ४० दिवसांच्या लॉकडाऊनच्या कालावधीत वीजेसकट एकूण इंधनाची मागणी ३०% घटली होती. ती आता पूर्ववत होत आहे.
Array