विशेष प्रतिनिधी
मुंबई : Shashikant Shinde राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मात्र आमदार रोहित पवार यांनी पाथ फिरवल्याचे पाहायला मिळाले. शरद पवारांनी अजित पवार गटातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची काही दिवसांपूर्वी स्तुती केली होती, त्यामुळे रोहित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यात त्यांनी या बैठकीला दांडी मारल्याने नाराजीच्या चर्चेला उधाण आले आहे. तर पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी बैठकीबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.Shashikant Shinde
शशिकांत शिंदे म्हणाले, फार मोठ्या उमेदीने पक्ष पुढे नेण्यासाठी सर्वांचा सहभाग असावा, त्यात खासदार असतील, आमदार असतील, ज्यांनी निवडणुका लढवल्या आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सगळ्यांनी वेळ देऊन पक्षात पूर्णपणे महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही उभा करण्याच्या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार तसेच खासदारांनी आपापली भूमिका मांडली आहे. तसेच हे आधी स्पष्ट करती की विलीनीकरणाचा हा विषय संपलेला आहे. यापुढे विलीनीकरणाबाबत कुठलीही चर्चा होणार नाही. आम्ही सक्षमपणे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्ष म्हणून हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे एक नेता म्हणून जो चेहरा आहे, तो घेऊन आम्ही महाराष्ट्रात जाणार आहोत.Shashikant Shinde
रोहित पवारांची खंत आम्ही दूर करू
आमदार रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना खंत व्यक्त केली होती की आमच्या पक्षातील नेते काम करत नाहीत, यावर प्रश्न विचारला असता शशिकांत शिंदे म्हणाले, आज मी तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो, त्यांनी माध्यमांच्या बाहेर काय सांगितले आहे ते मला माहीत नाही. पण मी एक सांगतो आम्ही पक्षाच्या शिस्तीतून आम्ही व्यवस्थित एकत्र काम करू. त्यांच्या काही खंत असतील त्या मी दूर करून भविशेत आक्रमकपणे आंदोलन करणार आहोत. आम्ही एक शिबिर देखील आयोजित करणार आहोत. आज नीट परीक्षेचा प्रश्न आहे, इंधन दरवाढ आहे, महागाई आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून पक्ष मजबूत करण्यात येणार आहे आणि पक्षाच्या चौकटीमधूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत.
15 ऑगस्टनंतर राज्यव्यापी दौरे
शशिकांत शिंदे म्हणाले, 15 ऑगस्ट नंतर आम्ही संयुक्तपणे कॉंग्रेस असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी आम्ही महाराष्ट्रात राज्यव्यापी दौरे करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात संघटन मजबूत करणार आहोत. जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही उतरणार आहोत. कार्यकर्ता आहे तिथे आहे, जनता आमच्या पाठीशी आहे. जनतेच्या माध्यमातून उठाव करून सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App