दीदी, आप हारी नही, म्हणून अखिलेश यादवांकडून ममतांचा हिरवी शाल घालून सत्कार; पुढच्या राजकारणाची चाहूल!!

Akhilesh Yadav

नाशिक : दीदी, आप हारी नही!!, असे म्हणत समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांच्या घरी जाऊन त्यांचा हिरवी शाल घालून सत्कार केला.Didi, you are not defeated, so Akhilesh Yadav felicitates Mamata with a green shawl; A glimpse of the future of politics!!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचा पराभव झाल्यानंतर त्यांना भेटणारे अखिलेश यादव हे पहिले मोठे नेते ठरले. ममता बॅनर्जींना पराभवानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे स्वतः अखिलेश यादव, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन या नेत्यांनी फोन करून त्यांचे सांत्वन केले होते. त्याचवेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही सुद्धा दिली होती. पण ममतांना फोन करणाऱ्यांमध्ये शरद पवारांचा किंवा सुप्रिया सुळे यांचा समावेश नव्हता.



– बाकी सगळ्या नेत्यांचे फक्त फोन

बाकी सगळ्या नेत्यांनी ममतांना फोन केले, पण अखिलेश यादव यांनी आज कोलकत्यात ममता बॅनर्जी यांच्या घरी जाऊन त्यांचा हिरवी शाल घालून सत्कार केला. दीदी, आप हारी नही. आपण लडी़!!, असे अखिलेश यादव त्यांना म्हणाले. यावेळी त्यांच्या समवेत अभिषेक बॅनर्जी सुद्धा होते. अखिलेश यादव ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या ममतांच्या घरात बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर ते तिथून निघून गेले.

– प्रतीकात्मक भेट, पण…

ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांची आजची ही भेट राजकीय दृष्ट्या सुद्धा प्रतिकात्मक ठरली. कारण भाजपने ज्या हिरीरीने प्रचार करून ममता बॅनर्जींचा पराभव केला, त्याच हिरीरीने ते पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या विरोधात उतरणार आहेत. उत्तर प्रदेशची निवडणूक लक्षात घेता अखिलेश यादव यांनी “आयपॅक” या संस्थेबरोबरचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून टाकले. याच आयपॅक संस्थेने ममता बॅनर्जींचा राजकीय सल्लागार म्हणून काम केले होते. त्याचवेळी ही संस्था मनी लॉन्ड्रीग मध्ये अडकल्याच्या आरोपाखाली अडचणीत आली. शिवाय ममता बॅनर्जींना “आयपॅक” संस्थेचा सल्ला सुद्धा राजकीय दृष्ट्या उपयोगी ठरला नाही. त्यामुळे अखिलेश यादव यांनी आयपॅक संस्थेबरोबरचा समाजवादी पार्टीचा करार रद्द करून टाकला.

– ममतांचा मुस्लिम तुष्टीकरणाचा अतिरेक

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींनी मुस्लिम तुष्टीकरणाचा अतिरेक केला. त्यामुळे भाजपला त्यांची हिंदू द्वेषी आणि हिंदू विरोधी प्रतिमा तयार करण्यात यश मिळाले. अखिलेश यादव यांचे राजकारण सुद्धा त्याच दिशेने गेल्याने भाजपने सुरुवातीपासूनच त्यांची प्रतिमा हिंदू द्वेषी आणि हिंदू विरोधी करून ठेवली आहे. भाजपला पुढच्या निवडणुकीपर्यंत ती प्रतिमा फक्त ठळकपणे अधोरेखित करत राहणे एवढेच़ काम करायचे आहे.

– हिंदू विरोधी प्रतिमा बदलायची खरी गरज

पण पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांच्या पराभवातून धडा घेऊन अखिलेश यादव यांनी मुस्लिम तुष्टीकरणाची भूमिका बदलली, हिंदू विरोधी राजकारणाची दिशा बदलून टाकली, तर भाजप पुढे ते मोठे आव्हान निर्माण करू शकतील. पण अखिलेश यादव यांनी ज्ञआज ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन त्यांचा हिरवी शाल घालून सत्कार करून तशी कुठलीच चिन्हे दर्शविली नाहीत. उलट हिरव्या शालीतली प्रतिकात्मकता जास्त ठळकपणे समोर आली. त्यामुळे पश्चिम बंगाल पाठोपाठ उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा निवडणुकीचा निकाल रिपीट होण्याचा राजकीय धोका समोर दिसून राहिलाय!!

Didi, you are not defeated, so Akhilesh Yadav felicitates Mamata with a green shawl; A glimpse of the future of politics!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात