Girish Mahajan : पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा; सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार, गिरीश महाजनांचा इशारा

Girish Mahajan

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Girish Mahajan सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल तुटवड्यासंदर्भात जे अफवा पसरवीत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, असा इशारा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर गॅस एजन्सीच्या बाहेर लोकांनी रांगा लावल्याचे पाहायला मिळाले होते. आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र तुटवडा नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात येत आहे.Girish Mahajan

गिरीश महाजन म्हणाले, इंधन पुरवठ्यासंदर्भात जगभरात अशीच परिस्थिती आहे, पण आपण संयम बाळगावा. करमर्शियल गॅस बाबतीत शॉर्टेज आहे, घरगुती बाबतीत नाही. भारतात रॉकेल आले असून त्याचा वापर करून आपली गरज भागवू शकतो. तसेच सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल तुटवड्यासंदर्भात जे अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशाराही महाजन यांनी दिला आहे.Girish Mahajan



पेट्रोल टंचाईच्या संदर्भात बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मागील महिन्यापेक्षा दीड पट मागणी गेल्या चार महिन्यात वाढली आहे. कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे, पेट्रोल पंप चालकांकडे संपूर्ण पेट्रोल-डिझेलचा साठा आहे. मात्र, मागणी अधिक वाढल्याने तुटवडा जाणवत आहे. अतिरिक्त साठा करण्याची गरज नाही, सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. त्यामुळे रांगा लागत आहेत. सिलिंडरसाठी देखील रांगा लावण्याची गरज नाही. नागरिकांना घरपोच सिलिंडर मिळत आहेत, कुठेही गर्दी करू नका, त्यामुळे सेवा विस्कळीत होत आहे, कुठेही तुटवडा नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना गिरीश महाजन यांना अशोक खरात प्रकरणी देखील प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, अशोक खरात प्रकरण अतिशय गंभीर असून ही विकृती आहे. आपल्या समाजात काही लोक या गोष्टी मानणारे आहेत, ते विश्वास ठेवतात. मला दोन महिन्यांपूर्वी याबाबत कल्पना होती, पोलिसांना तशी सूचना दिली होती. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार गंभीर दखल घेतली जाईल.

पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, अशोक खरात कायमस्वरूपी कसा जेलमध्ये राहील हे पाहिले जाईल. खरातची हजारो कोटींची प्रॉपर्टी आहे, त्याच्या प्रॉपर्टीज कशा जोडल्या जातील याबाबत देखील कारवाई होईल, अशी माहिती महाजन यांनी दिली आहे.

No Fuel Shortage in Maharashtra; Minister Girish Mahajan Warns Rumor Mongers

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात