मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावर केलेले भाषण ऐकल्यावर प्रबोधनकारांचे उद्बोधनकार नातू हेच नामाभिधान त्यांना शोभले असे वाटले. प्रबोधनकारांचे उद्बोधनकार नातू हे बिलकुल त्यांची खिल्ली उडविण्यासाठी लिहिलेले शीर्षक नाही. कारण राज ठाकरे यांचे कालचे भाषण, विशेषत: त्या भाषणातला उत्तरार्ध खरंच प्रबोधनकारांचे उद्बोधनकार नातू याच नामाभिधानाला शोभणारा होता. Raj Thackeray
कारण राज ठाकरे यांनी भाषणाच्या उत्तरार्धामध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान व्यक्तींची नावे घेतली आणि त्यांची माहिती सांगितली, तेवढी महाराष्ट्रातल्या कुठल्याच वक्त्याने आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या जाहीर मेळाव्यात सांगितलेली नव्हती. त्यातही कुठल्याही राजकीय पुढार्याच्या भाषणात महाराष्ट्रातल्या एवढ्या कर्तृत्ववान व्यक्तींची नावे गेल्या कित्येक वर्षांमध्ये आली नव्हती. ती सगळी नावे राज ठाकरे यांनी कालच्या आपल्या भाषणातल्या उत्तरार्धात घेतली. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः पंधरा-वीस वर्षांमध्ये महाराष्ट्रात “पवार बुद्धीच्या’ लोकांनी जे narrative सेट करून ठेवले आहे, की महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. यातून महाराष्ट्रात इतर कुणी महापुरुष जन्मालाच आले नाहीत, असे भासविण्याचा आणि ठसविण्याचा प्रयत्न झाला किंबहुना “डाव” खेळला गेला. अर्थात यात फुले शाहू आंबेडकरांचा अधिक्षेप करायचे कारण आणि हेतू नाही, पण ज्यांनी तो narrative सेट केला, त्यांचा अजेंडा मात्र महाराष्ट्रात जात विषाची पेरणी करायचाच होता, हे विसरून चालणार नाही.
– विस्मृतीत गेलेल्या व्यक्तीश्रेष्ठांच्या आठवणींना उजाळा
पण राज ठाकरे यांनी अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते शिवकर बापूजी तळपदे, जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ अजिंक्य, चिंतामणराव देशमुख, पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्या पर्यंतची नावे घेतली. त्या पलीकडे जाऊन राज ठाकरे यांनी कला, क्रीडा, सहकार, साहित्य, विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या व्यक्तीश्रेष्ठांची नावे घेतली. त्यातली कित्येक नावे, तर महाराष्ट्रात विस्मृतीत गेली होती. त्या नावांची कुणालाही आठवण शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे खरं म्हणजे त्या नावांपेक्षा विस्मृतीपेक्षा महाराष्ट्राचीच ओळख धूसर बनली होती, ही सगळी सुमारे शंभर ते दीडशे नावे घेऊन राज ठाकरे यांनी या कर्तृत्ववान व्यक्तींच्या स्मृतींना उजाळा दिला. कोकणातल्या एकट्या दापोली तालुक्यातल्या पांडुरंग वामन काणे, महर्षी धोंडो केशव कर्वे, आचार्य विनोबा भावे, बाबासाहेब आंबेडकर या चार भारतरत्नांच्या स्मृतींना अभिवादन केले. पण हे अभिवादन करताना त्यांनी महाराष्ट्र या सगळ्यांना विसरल्याची खंत व्यक्त केली. ती अगदीच रास्त होती.
… आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे राज ठाकरे यांनी सगळ्या महाराष्ट्राला संबोधित करताना आता तरी कर्तृत्ववान व्यक्तींकडे आणि महापुरुषांकडे तुम्ही जातीच्या चष्म्याच्या पलीकडे जाऊन पाहा, असे आवाहन केले. या आव्हानाला वैचारिक अधिष्ठान प्राप्त व्हावे म्हणून तर त्यांनी एवढ्या विस्तृत प्रमाणावर महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान व्यक्ती श्रेष्ठांची नावे घेतली. या अर्थाने राज ठाकरे यांचे कालच्या गुढीपाडवा मेळाव्यातले भाषण हे प्रबोधनकारांचे उद्बोधनकार नातू अशाच आशयाचे झाले, असेच म्हणावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App