विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या “शेट्टी टॉवर’ निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून याप्रकरणी आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर सध्या परदेशात असून त्याच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.Devendra Fadnavis
या गुन्ह्यामागे बिश्नोई गँगचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए ) ताब्यात असलेल्या अनमोल बिश्नोईचा ताबा मुंबई पोलिसांना मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. एनआयएची कोठडी संपल्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.Devendra Fadnavis
आमदार मिलिंद नार्वेकर यांनी रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानावरील गोळीबाराबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तर आमदार सचिन अहिर यांनी चित्रपट क्षेत्रातील कलाकारांमध्ये पसरलेल्या भीतीबद्दल चिंता व्यक्त केली. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, एका व्यक्तीने भिंतीलगत पिस्तूल चालवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी मिळालेल्या स्कूटीच्या आधारे पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपींना अटक केली. घटनेनंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने तपास केला.
चित्रपटसृष्टीत ‘दहशतीचे अर्थकारण’
गेल्या काही वर्षांत केवळ गुन्हेगारी विश्वातच नाही, तर ग्लॅमर आणि बिझनेस, राजकीय विश्वातही दहशत पसरवण्यासाठी बिश्नोई गँग चर्चेत आली आहे. ९० च्या दशकातील गँगवॉरची भीती बिश्नोई गँगमुळे पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पसरत आहे. सलमान खान, सिद्धू मूसेवाला आणि बाबा सिद्दिकी यांच्यानंतर आता रोहित शेट्टीला लक्ष्य करणे, हे केवळ वैयक्तिक हल्ले नसून चित्रपटसृष्टीवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न आहे. जेलमधून आणि परदेशातून चालवल्या जाणाऱ्या या कारवायांतून ‘दहशतीचे अर्थकारण’ पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे.
मुंबईत गँगवार होऊ देणार नाही
काँग्रेस आणि भाजपच्या काही आमदारांनाही धमकीचे फोन आले होते, मात्र पोलिसांनी ते प्रयत्न हाणून पाडले आहेत. धमकीचे कॉल आल्यावर सेलिब्रिटींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे, म्हणूनच रोहित शेट्टी यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. मुंबईची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असून शहराला पुन्हा एकदा गँगवॉरच्या खाईत लोटण्याचे कुणाचेही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास फडणवीस यांनी सभागृहात व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App