CM Devendra Fadnavis : राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही:पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

CM Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CM Devendra Fadnavis इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरकसपणे फेटाळून लावला आहे. राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही. माध्यमांनी काही शहरांत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त दिले. त्यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठ्या रांगा लागल्या. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार भविष्यातील स्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे, असे ते म्हणालेत.CM Devendra Fadnavis

आखातातील इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धाचा फटका अवघ्या जगाला बसत आहे. त्याच्या झळा आता महाराष्ट्रातही पोहोचल्या आहेत. सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 60 रुपयांची वाढ केली. तसेच त्याच्या वितरणावरही काही ठराविक दिवसांची कॅप लावली. विशेषतः तेल कंपन्यांनी पुण्यातील वितरकांना पैसे दिल्याशिवाय इंधन देण्यास नकार दिल्यामुळे राज्यात इंधन टंचाई निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे.CM Devendra Fadnavis



 

राज्यात कुठेही इंधन टंचाई नाही – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले, लोकांना चुकीची माहिती देऊन पॅनिक तयार करण्याची गरज नाही. केंद्र सरकारने यासंदर्भातील आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशाप्रकारे पाऊले उचलली हे आपल्यासमोर आले आहे. सध्या राज्यात कुठेही इंधन टंचाई नाही. काही माध्यमांनी दोन-तीन दिवस झाले पेट्रोल – डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या बातम्या दिल्या. यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठमोठ्या रांगा लागल्या. असा कोणताही तुटवडा नाही. केंद्र सरकारनेही हे स्पष्ट केले आहे. भविष्यात जी परिस्थिती उद्भवेल, त्याचा सामना करण्यासाठी भारत सरकार मोदींच्या नेतृत्वा सक्षमपणे भक्कम परिस्थितीत आहे.

घरगुती अन् व्यावसायिक गॅसच्या किंमतीत वाढ

उल्लेखनीय बाब म्हणजे इराण युद्धामुळे सध्या भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारने व्यावसायिक गॅसच्या दरात अचानक 150 ते 200 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे हॉटेल व्यवसाय कसा चालवायचा? हा प्रश्न व्यावसायिकांपुढे उभा राहिला आहे. दुसरीकडे, घरगुती गॅसच्या दरातही एकरकमी 60 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचेही बजेट कोलमडले आहे. त्यातच काही शहरांत गॅसचा पुरवठा कोलमडल्यामुळे स्थिती बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुण्यातील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. देशात गॅसचे दर वाढत आहेत. तेलाचे दर वाढत आहेत. किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढले आहेत. पण आमचे पगार काही वाढत नाहीत. गॅस एजन्सीकडे गेल्यानंतर अनेक वेळा वेळेवर गॅस मिळत नाही, अशी ओरड या महिलांनी केली आहे.

No Fuel Shortage in Maharashtra: CM Devendra Fadnavis Dismisses Panic VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात