दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यापूर्वी 1500 जलस्रोतांचे पुनरुज्जीवन; टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशनचा पुढाकार

water sources

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा वसा घेतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. याचा लाभ महाराष्ट्राने घेतला. त्या पलीकडे जाऊन काही खाजगी संस्थांनी सुद्धा सरकारच्या या उपक्रमाला हातभार लावला. water sources

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मृद आणि जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन, टाटा मोटर्स फाऊंडेशन आणि नाम फाऊंडेशन यांच्यात ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजने’अंतर्गत आगामी पावसाळ्यापूर्वी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील 1500 जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमाद्वारे भूजल पुनर्भरण आणि दीर्घकालीन जलसुरक्षा सुनिश्चित केली जाणार आहे.

यावेळी मंत्री जयकुमार गोरे, मंत्री अदिती तटकरे, मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा, टाटा मोटर्स चे सीएसआर हेड विनोद कुलकर्णी, नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Revival of 1500 water sources in drought-hit districts before monsoon

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात