सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करायचे घाटत असतानाच त्यात मध्येच राष्ट्रवादीच्या ऐक्याचा खोडा; सुप्रिया सुळेंचे नेतृत्व पुढे सरकवायचा डाव!!

Supriya Sule

नाशिक : अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करायचे घाटत असतानाच, त्यात मध्येच राष्ट्रवादीचा ऐक्याचा खोडा घालायचा आणि सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे सरकवायचे, असा डाव राष्ट्रवादीतले काही नेते खेळत असल्याचे उघड झाले.A plan to advance Supriya Sule’s leadership!!

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधले अनेक नेते सुनेत्रा पवारांकडे पक्षाचे नेतृत्व सोपवून त्यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी आग्रही बनले. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी नेत्यांनी पुढाकार घेतला. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करायचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यायचा बेत सुद्धा ठरला.



पण या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या वक्तव्याचा हवाला देऊन आधी राष्ट्रवादीचे ऐक्य घडवावे, असे “राजकीय पिल्लू” मध्येच सोडण्यात आले. त्यातूनच ऐक्य झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार??, असा सवाल सुद्धा पुढे सरकवण्यात आला. यातून अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे दामटण्याचा डाव उघड्यावर आला.

– सुनेत्रा पवारांचा अनुभव कमी म्हणून…

सुनेत्रा पवार आज जरी राज्यसभेच्या खासदार असल्या तरी आतापर्यंत त्यांनी अजितदादांची सावली म्हणूनच महाराष्ट्रात वावर ठेवला होता. अजितदादांना जेवढा प्रशासनाचा अनुभव होता, तेवढा सुनेत्रा पवार यांना बिलकुल अनुभव नाही. सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी नेहमीच पडद्यामागे राहून अजितदादांना मदत केली होती. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या अनुभव नसण्याचा “लाभ” घेऊन त्यांच्या ऐवजी सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे यावे. कारण सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्यापेक्षा त्याच बरोबर पार्थ आणि जय पवार यांच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. त्यामुळे एकीकृत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्या ऐवजी सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवावे, अशा आशयाचे “राजकीय पिल्लू” पवार गटातल्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात हळूच सोडून दिले.

– सुप्रिया सुळेंचे नाव उघपणे घेणे शक्य नाही, म्हणून…

सुनेत्रा पवार यांच्या भोवती अजित पवार गटातले नेते एकत्र होत असतानाच सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाचे घोडे पुढे दामटण्यात आले. पण अजित पवार हयात नसण्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचे नाव उघडपणे घेणे हे सोयीचे ठरणार नसल्याने त्याऐवजी आत्ता राष्ट्रवादीच्या ऐक्याचा प्रश्न मुद्दाम पुढे रेटण्यात आला. अजित पवारांना राष्ट्रवादीचे ऐक्य हवे होते. त्यांना शरद पवारांना १२ डिसेंबरला वाढदिवसाचे गिफ्ट घ्यायचे होते, असे वक्तव्य अंकुश काकडे यांनी केले. या वक्तव्याला जयंत पाटील यांनी दुजोरा दिला. त्यांच्या वक्तव्याला मराठी माध्यमांनी जोरदार प्रसिद्धी दिली. वास्तविक सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे आणि उपमुख्यमंत्री पदाचे नेतृत्व सोपवून नंतर राष्ट्रवादीच्या ऐक्याचा विषय काढता आला असता. कारण तो विषय एवढा तातडीचा नाही. परंतु, तो विषय आत्ताच समोर आणून या विषयाचे महत्त्व सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व सोपविण्याच्या विषयापेक्षा वाढवून ठेवण्यात आले.

– पवार म्हणाले होते, सुनेत्रा या “बाहेरून आलेल्या पवार”

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवारांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले होते. सुप्रिया सुळे या “मूळच्या पवार” आहेत, तर सुनेत्रा पवार या “बाहेरून आलेल्या पवार” आहेत, असे शरद पवार म्हणाले होते. याचा अर्थ शरद पवार सुनेत्रा पवारांचे नेतृत्व स्वीकारालाच तयार नव्हते. आणि आता जेव्हा अजित पवार हयात नाहीत, त्यावेळी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्याची तयारी सुरू असताना शरद पवारांच्या गटातून मात्र राष्ट्रवादीच्या ऐक्याचा मुद्दा तातडीचा नसताना देखील तो मुद्दामून पुढे करण्यात आला. हेच राजकीय सत्य काल रात्री समोर आले.

A plan to advance Supriya Sule’s leadership!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात