वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Supreme Court हरियाणातील जाट समुदायाशी संबंधित नीट-पीजीच्या दोन उमेदवारांनी परीक्षेपूर्वी बौद्ध धर्म स्वीकारल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने बुधवारी प्रश्न उपस्थित केले. कोर्टाने म्हटले की, हे मेडिकलच्या पीजी कोर्समध्ये अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न दिसतो. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर निखिल पुनिया आणि एकता यांच्या रिट याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यांनी मेरठमधील एका मेडिकल कॉलेजमध्ये बौद्ध अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश मागितला होता.Supreme Court
सरन्यायाधीशांनी विचारले, पुनिया हे एससीही असतात आणि जाटही. तुम्ही कोणते आहात? याचिकाकर्त्यांनी उत्तर दिले, जाट आहोत. सरन्यायाधीशांनी विचारले, मग तुम्ही अल्पसंख्याक कसे झालात? वकिलाने सांगितले की, बौद्ध धर्म स्वीकारला आहे. सरन्यायाधीशांनी यावर अविश्वास व्यक्त करत म्हटले, हा नवीन फ्रॉड आहे. तुम्हाला खऱ्या अल्पसंख्याकांचे अधिकार हिरावून घ्यायचे आहेत. सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना सांगितले की, तुम्ही अत्यंत समृद्ध, उच्च जातीय समुदायांपैकी आहात. तुमच्याकडे शेतजमीन आहे आणि सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आपल्या गुणवत्तेवर अभिमान बाळगा, वंचितांचे अधिकार हिरावून घेऊ नका. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.
नीट-पीजी… अर्जात नमूद केली होती सामान्य श्रेणी
दोन्ही उमेदवारांनी नीट-पीजीसाठी सामान्य श्रेणीतून अर्ज केला होता. त्यांनी हेदेखील स्पष्ट केले होते की, ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नाहीत. मात्र, नंतर अल्पसंख्याक कोटा मागितला. न्यायालयाने त्यांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र जारी केल्याप्रकरणी सखोल चौकशीची गरज असल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App