विशेष प्रतिनिधी
पुणे : बारामती जवळ झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार कालवश झाले. या दुर्घटनेबद्दल देशात अनेकांनी संशयाचे मळभ निर्माण केले. संशयाने भरलेल्या या वातावरणात शरद पवारांनी एक वक्तव्य केले. बारामती जवळ झालेला नेपाळ अपघात होता. त्यामध्ये कोणी राजकारण करू नये, असे आवाहन शरद पवारांनी केले.
बारामती जवळच्या विमान दुर्घटनेबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संशयाचे मळभ निर्माण केले. अजित पवार भाजपची साथ सोडणार होते. या पार्श्वभूमीवर ही विमान दुर्घटना झाली. देशात कुणीही सुरक्षित नाही. त्यामुळे या दुर्घटनेची चौकशी सुप्रीम कोर्टामार्फत करावी. केंद्राच्या कुठल्याच एजन्सीवर माझा विश्वास नाही, असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केले. त्यानंतर विविध माध्यमांनी संशयाचे मळख निर्माण करणाऱ्या बातम्या दिल्या.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बारामती येथून या संदर्भात स्पष्ट खुलासा केला. बारामती मध्ये झालेला निव्वळ विमान अपघात होता. त्याबद्दल कोणी राजकारण करू नये. अजित पवार कर्तृत्ववान नेते होते. त्यांच्या कर्तृत्वाला महाराष्ट्र मुकला, अशा शब्दांमध्ये पवारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पण प्रामुख्याने त्यांनी विमान दुर्घटनेबद्दल “अपघात” हा शब्द वापरून संशयाचे मळभ दूर करण्याचा प्रयत्न केला.
पण त्यानंतरही अनेकांनी संशय व्यक्त करून वेगवेगळ्या चौकशांची मागणी केली. त्यामध्ये ममता बॅनर्जी यांच्याबरोबरच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, वकील नितीन सातपुते यांचाही समावेश होता. या सगळ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलून किंवा सोशल मीडियावर संशय व्यक्त करणाऱ्या पोस्ट केल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App