अमृता फडणवीसांविषयी अंजली भारतीच्या गलिच्छ वक्तव्यावरून महाराष्ट्रात संताप; सगळीकडून निषेध!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गायिका अंजली भारती हिने अमृता फडणवीसन विषयी केलेल्या गलिच्छ वक्तव्यावरून महाराष्ट्रात प्रचंड संताप उसळला असून सगळीकडून तिचा निषेध करण्यात येत आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अंजली भारती हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या विषयी अतिशय गलिच्छ वक्तव्य केले. बलात्काराचे समर्थन केले. अंजली भारतीचा हा व्हिडिओ सगळीकडे प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर महाराष्ट्रात तिच्या गलिच्छ वक्तव्याविरोधात प्रचंड संताप उसळला.

भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ आणि मुंबई महापालिकेतल्या ठाकरे गटाच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अंजली भारती हिच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करायची मागणी केली. देशातल्या कुठल्याही व्यक्तीशी राजकीय मतभेद असू शकतात त्याविषयी कोणी बोलू पण शकते.

परंतु, बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर उभे राहून अंजली भारती मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची भाषा वापरते. अंजली भारती हिच्या बुद्धीची कींव करावी तेवढी थोडी आहे. तिच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे वक्तव्य चित्रा वाघ आणि किशोरी पेडणेकर यांनी केले. अंजली भारतीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड पडसाद उमटले. सगळीकडून तिच्या वक्तव्याचा प्रचंड निषेध झाला.

Anger in Maharashtra over Anjali Bharti’s dirty statement about Amrita Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात