एकनाथ शिंदेंची सातारा जिल्ह्यात निवडणूक मुशाफिरी; महाबळेश्वरच्या तळदेव मध्ये शिंदे सेनेची सभा

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

महाबळेश्वर : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विशेष सभा पार पडली.

महाबळेश्वर, तापोळा, प्रतापगड, कुंभरोशी, वाडा परिसराच्या विकासावर भर देणार असून या परिसराची ओळख मिनी महाबळेश्वर, शांत महाबळेश्वर अशी प्रस्थापित करू, अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली. होम स्टे, फार्म स्टे, सेंद्रीय शेती, ग्रामीण पर्यटन, वॉटर स्पोर्ट्स, बॅकवॉटर पर्यटन, वेलनेस सेंटर, जलपर्यटन, रोपवे, पर्यटन महोत्सव या माध्यमातून रोजगारनिर्मिती केली जाईल. या भागात उद्योग, सीएनजी प्रकल्प, एमआयडीसी निर्माण करून किमान १० ते १५ हजार लोकांना रोजगार देणारे उद्योग उभे केले जातील, असे यावेळी अधोरेखित केले.



किल्ले प्रतापगडाच्या विकासासाठी १६० ते १७० कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगताना याठिकाणी रस्ता रुंदीकरण, पार्किंग, पर्यटन सुविधा, मंदिर विकास, जलपर्यटन, हायड्रो प्रकल्प, रोपवे अशी कामे करायची आहेत. या सर्व कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही याप्रसंगी स्पष्ट केले. रामवरदायिनी मंदिर, शिवमंदिर पर्यटन, महादेव कोळी समाजाच्या जात पडताळणी, बौद्ध समाजासाठी भव्य भवन, महिला रुग्णालय, उमेद मॉल, पाचगणी आणि सातारा येथील बचत गट विक्री केंद्र निर्माण करू असेही यावेळी आश्वासीत केले.

रस्ते विकासासाठी पाटण-कराड-वाई-जावळी-महाबळेश्वर मार्गासाठी १४० कोटी, विविध जिल्हा मार्गांसाठी शेकडो कोटी, उंब्रज-मसूर-मायणी-पंढरपूर मार्गासाठी ४०० कोटी तसेच अनेक दुर्गम गावांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केल्याचे याप्रसंगी नमूद केले.

या भागातील जो तरुण नोकरीसाठी बाहेर गेला आहे, तो पुन्हा आपल्या गावात परत यावा, इथेच त्याला रोजगार मिळावा यासाठी या भागात मोठे प्रकल्प आणण्याचे नक्की प्रयत्न केले जातील अशी ग्वाही याप्रसंगी दिली. आगामी पाच तारखेला धनुष्यबाण चिन्हासमोरचे बटण दाबून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.

यावेळी माजी आमदार दगडूदादा सकपाळ तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Eknath Shinde’s election campaign in Satara district; Shinde faction holds a meeting in Taldev, Mahabaleshwar.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात