अजितदादांच्या सत्तेच्या तुकड्याला आतून आणि बाहेरून दोन्हीकडून सुरुंग!!

Ajit Pawar

नाशिक : महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारमध्ये भाजपने अजित पवारांच्या वाटाल्या दिलेल्या सत्तेच्या तुकड्याला आतून आणि बाहेरून असा दोन्हीकडून सुरुंग लावण्यात आल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय घडामोडींमधून उघड झाला.Ajit Pawar cornered by BJP and opposition at the same time

– स्थानिक पैलवानांकडून पराभव

महापालिका निवडणुका स्वतंत्र लढवल्या, तरी एकमेकांवर टीका करायची नाही, असे भाजपने अजित पवारांना निक्षून बजावल्यानंतर सुद्धा अजित पवारांनी भाजपला टार्गेट केले. स्वतःवरच भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप असताना भाजपला भ्रष्टाचारी ठरवायचा डाव खेळला. पण पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीत तो अजित पवारांच्याच पुरता अंगलट आला. मुरलीधर मोहोळ आणि महेश लांडगे या स्थानिक पैलवानांनी अजित पवारांसारख्या राज्यस्तरावरच्या पैलवानाला मातीत लोळवले.



त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवारांना मवाळ भूमिका घेणे भाग पडले. ते भाजपवर टीका करायला धजावलेच नाहीत. पण त्या पलीकडे जाऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या दणकून पराभवातून अजित पवारांच्या सत्तेच्या तुकड्याला आतून आणि बाहेरून अशा दोन्हीकडून सुरुंग लावण्याचा डाव खेळण्याचे प्रकार सुरू झाले.

– भाजपने कापले पंख

एकीकडे भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांचे पंख कापले. त्यांच्या हातातली दोन महत्त्वाच्या महापालिकांमधली सत्ता कायमची हिरावून घेतली. अजित पवारांचे अर्थमंत्री पद केवळ शोभेचे ठेवले. अजित पवारांनी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सरकारांमध्ये त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांवर दादागिरी केली, पण भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आल्यानंतर भाजपच्या लोकल नेत्यांनी अजित पवारांचा नक्षा उतरवला.

– संजय राऊत आणि सतेज पाटलांचे टोमणे

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि काँग्रेसचे विधान परिषदेचे नेते सतेज पाटील यांनी अजित पवारांना टोचले. लवकरच सगळ्या पवारांचे री युनियन होईल अजित पवारच शरद पवारांबरोबर विरोधामध्ये बसायला येतील, असा दावा संजय राऊत यांनी सकाळी केला. संजय राऊत यांच्या या वक्तव्याला सतेज पाटील यांनी वेगळ्या प्रकारे दुजोरा दिला.
भाजपने अजित पवारांना सत्तेजवळ घेऊन त्यांचा पराभव केला. अजित पवार जर स्वाभिमानी असतील, तर त्यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीत दाखल व्हावे आम्ही त्यांचे इकडे स्वागतच करू, असे वक्तव्य सतेज पाटील यांनी केले. अर्थात अजित पवार पुढच्या चार वर्षांची सत्ता सोडून आमच्याकडे येतील असल्या भ्रमात मी नाही असा टोमणा सुद्धा सतेज पाटील यांनी अजित पवार यांना हाणला.

– भोकं पडली नाही तरी…

या सगळ्यात अजित पवारांची दोन्ही बाजूंनी कोंडी झाली. महापालिकांच्या निवडणुकीत भाजपवर टीका करून त्यांनी नसती आफत स्वतःवर ओढवून घेतली. त्यांना भाजपने पराभवाचे तोंड तर दाखवलेच, उलट विरोधकांकडूनही त्यांना टोमणे सहन करावे लागले. विरोधकांनी टीका केल्यानंतर माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत, असे अजित पवार एकदा म्हणाले होते. पण विरोधकांच्या टीकेमुळे त्यांच्या अंगाला जरी भोकं पडली नसली, तरी भाजपने त्यांच्या वाट्याला दिलेल्या सत्तेच्या तुकड्याला मात्र आतून आणि बाहेरून सुरुंग लावला, हे मात्र यानिमित्ताने स्पष्ट झाले.

Ajit Pawar cornered by BJP and opposition at the same time

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात