Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना मोठा दिलासा; ACB नंतर आता EDच्या प्रकरणातही निर्दोष सुटका

Chhagan Bhujbal

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Chhagan Bhujbal राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) छगन भुजबळ यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाचा तपास करत होते. या तपासाअंती आता ईडीने छगन भुजबळ यांना निर्दोष मुक्त केले आहे.Chhagan Bhujbal

सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी कोणतीही निविदा न मागवता के.एस. चामणकर एंटरप्राइजेसला कंत्राट दिले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. छगन भुजबळ आणि इतरांनी निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने असा दावा केला होता की, सरकारी कर्मचाऱ्यांनी अहवालात चुकीची माहिती दिली आणि बनावट ताळेबंद तयार केले. विकासकाला 1.33 टक्के नफा होणार असल्याचे दाखवण्यात आले, मात्र, प्रत्यक्षात तो 365.36 टक्के होता, असे एसीबीचा आरोप होता.Chhagan Bhujbal



विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांना या प्रकरणी सप्टेंबर 2021 मध्ये दोषमुक्त केले होते. त्यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले होते की, विकासकाने भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाला 13.5 कोटी रुपये दिल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. तसेच एसीबीने केलेला नफा-तोट्याचा हिशोब अयोग्य आणि बेकायदेशीर असल्याचेही कोर्टाने नमूद केले होते. कंत्राटाचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, परिवहन मंत्री आणि सात वरिष्ठ नोकरशहांच्या समितीसमोर गेला होता. त्यामुळे केवळ चुकीची माहिती देऊन या सर्वांची दिशाभूल केली गेली, हे मान्य करणे कठीण असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

भुजबळांच्या 17 मालमत्तांवर छापे टाकले होते

दरम्यान, महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2015 साली छगन भुजबळ यांच्या मुंबई, ठाणे आणि नाशिक येथील एकूण 17 मालमत्तांवर छापे टाकले होते. मुंबईतील 7, ठाण्यातील 2, पुण्यातील 2 आणि नाशिकमधील 5 मालमत्तांवर छापे टाकण्यात आले होते. तसेच भुजबळांवर पदाचा गैरवापर आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

हेक्सवर्ल्ड प्रकरणी छगन भुजबळांचे चिरंजीवही निर्दोष

नवी मुंबई येथील हेक्सवर्ल्ड नावाच्या गृहनिर्माण प्रकल्पात सदनिका खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ व पुतण्या समीर भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. 2344 फ्लॅट्स विकून 44 कोटी रुपये गोळा केले गेले, परंतु प्रकल्प पूर्ण झाला नसल्याचे सांगण्यात आले होते. सप्टेंबर 2021 मध्ये विशेष न्यायालयाने पंकज आणि समीर भुजबळ यांना या फसवणुकीच्या प्रकरणातून दोषमुक्त केले होते.

Clean Chit to Chhagan Bhujbal: Discharged in ED Money Laundering Case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात