वृत्तसंस्था
टोकियो : Shinzo Abe जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या मारेकऱ्याला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 8 जुलै 2022 रोजी नारा शहरात निवडणूक प्रचारादरम्यान शिंजो आबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.Shinzo Abe
सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी तेत्सुया यामागामीचा गुन्हा अत्यंत गंभीर आहे आणि त्याला कठोर शिक्षा दिली पाहिजे. तर यामागामीच्या वतीने बचाव पक्षाने युक्तिवाद केला की तो धार्मिक शोषणाचा बळी होता.Shinzo Abe
त्याच्या वकिलांनी सांगितले की, यामागामीची आई युनिफिकेशन चर्चशी संबंधित होती आणि त्यामुळे कुटुंब मोठ्या कर्जात बुडाले होते.Shinzo Abe
यामागामीने न्यायालयात सांगितले की, सुरुवातीला त्याचा इरादा चर्चशी संबंधित अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा होता. पण, 2021 मध्ये त्याने शिंजो आबे यांचा एक व्हिडिओ पाहिला, ज्यात आबे यांचा त्या चर्चशी संबंध दाखवण्यात आला होता. त्यानंतर त्याने आबे यांनाच लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला.
गुन्हेगाराने स्वतःच बनवली होती बंदूक
न्यायालयात यामागामीने आपला गुन्हा कबूल करताना सांगितले, “हे सर्व सत्य आहे. यात शंका नाही की मी हे केले.” त्याने सांगितले की, त्याने दोन लोखंडी पाईप आणि डक्ट टेपच्या मदतीने स्वतःच एक देशी बंदूक बनवली होती आणि त्याच बंदुकीने गोळीबार केला.
घटनेच्या दिवशी शिंजो आबे नारा शहरात निवडणूक प्रचारादरम्यान भाषण देत होते. तेव्हा 42 वर्षांचा हल्लेखोर मागून आला आणि त्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या लागताच आबे व्यासपीठावर कोसळले. त्यांना तात्काळ हेलिकॉप्टरने नारा मेडिकल युनिव्हर्सिटी रुग्णालयात नेण्यात आले.
डॉक्टरांनी सुमारे सहा तास त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, पण उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. आबे यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकातील एका डॉक्टरांनी नंतर सांगितले होते की, एक गोळी थेट त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App