विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Devendra Fadnavis स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या ५६ व्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्रात ३७ लाख २७ हजार ७८७ लाख कोटी रुपयांचे ८१ सामंजस्य करार झाले. यातून ४२ लाख रोजगार निर्माणहोणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.CM Devendra Fadnavis
महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दावोसमधून आलेली ही सर्वात गुंतवणूक मोठी घोषणा असल्याचे म्हटले जात आहे. कारण २०२१ ते २५ या ५ वर्षांत सुमारे २२ लाख कोटींचे करार झाले होते. अदानी समूहाने राज्याच्या प्रगतीसाठी ६६ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ६,०५,०२२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा ‘मास्टर प्लॅन’ सादर केला.CM Devendra Fadnavis
यात प्रामुख्याने धारावी पुनर्विकास, पायाभूत सुविधा, हरित उर्जा, तंत्रज्ञान प्रकल्पात ही गुंतवणूक असेल. पायाभूत सुविधा, हरित ऊर्जा आणि तंत्रज्ञानात अदानी समूह राज्याचा ‘दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार’ म्हणून काम करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारामुळे आगामी ७ ते १० वर्षांत महाराष्ट्राचे आर्थिक चित्र पूर्णपणे पालटणार आहे. राज्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी ही गुंतवणूक मैलाचा दगड ठरेल, असे फडणवीस म्हणाले.
संभाजीनगरात १७,७०० कोटींची गुंतवणूक
विभाग करार संख्या गुंतवणूक रक्कम मुंबई महानगर प्रदेश ३७ २३,९३,३०० लाख कोटी इतर विभाग ७ ७२,७२० लाख कोटी कोकण ११ ३,१०,८८६ लाख कोटी नागपूर ०९ १,९५,९५० लाख कोटी नाशिक ०७ ३०,१०० कोटी छत्रपती संभाजीनगर ०२ १७,७०० कोटी पुणे ०४ ३,२५० कोटी अमरावती ०१ १,००० कोटी
काँग्रेसकडून श्वेतपत्रिकेची मागणी
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष, खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दावोस दौरा जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे. लोढा डेव्हलपर्स, रहेजासारख्या मुंबईस्थित कंपन्यांच्या करारासाठी दावोसला जाण्याची गरज काय? गुंतवणूक, रोजगारावर सरकारने श्वेतपत्रिका काढावी.
एमएमआरडीए: ९.५ लाख कोटींचे करार
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) १२ जागतिक संस्थांसोबत ९.५२ लाख कोटींचे सामंजस्य करार केले. यामुळे मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ९.५ लाख थेट व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील.
भारतीय कंपन्यांच्या विदेशी भागीदारांमुळे दावोसला करार केले जातात : फडणवीस
“मुंबईत मंत्रालयाऐवजी दावोसला करार का?’ या विरोधकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, दावोसला जगभरातील मोठे उद्योजक येतात. भारतीय कंपन्यांच्या विदेशी भागीदारांना आणि संचालक मंडळाच्या सदस्यांना कराराच्या वेळी उपस्थित राहण्याची इच्छा असते. हे सर्व सदस्य मुंबईत येऊ शकत नाहीत, परंतु दावोसमध्ये ते सहज उपलब्ध असतात. म्हणून तेथे करार केले जातात.
अदानी समूह ७ वर्षांत ६ लाख कोटी रुपये गुंतवणार
जामनेरमध्ये कोका-कोलाचा प्रकल्प येणार
जामनेर एमआयडीसीत (जळगाव) ‘कोका-कोला’ कंपनी प्रकल्प उभारणार आहे. फडणवीसांनी कोका-कोलाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मायकल गोल्टझमन यांची भेट घेऊन यावर शिक्कामोर्तब केले. याविषयी महाजन म्हणाले की, या प्रकल्पामुळे तालुक्याच्या विकासाला मोठी गती मिळेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App