केरळच्या कम्युनिस्ट मुख्यमंत्र्यांनी भाजप प्रणित NDA मध्ये सहभागी व्हावे; रामदास आठवलेंची अजब सूचना!!; पण ही कम्युनिस्टांना “गुगली”, की भाजपला “बाउन्सर”??

Ramdas Athawale

नाशिक : केरळमध्ये लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महाराष्ट्रातले नेते आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे केरळच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविल्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तिरुअनंतपुरम मध्ये जाऊन एक वेगळीच भाजप सूचना केली. त्यामुळे सत्ताधारी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) वेगळीच राजकीय खळबळ माजली. अशी सूचना करून रामदास आठवले यांनी अशी सूचना करून कम्युनिस्टांना “गुगली” टाकली, की भाजपला “बाउन्सर” टाकला??, या विषयाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.Kannur, Kerala: At a press conference, Union Minister Ramdas Athawale

– विनोद तावडे केरळ प्रभारी

केरळमध्ये भाजप आपले राजकीय पाय घट्ट रोवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असताना तो एकीकडे काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटशी (UDF) संघर्ष करतोय, तर दुसरीकडे सत्ताधारी कम्युनिस्ट प्रणित लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटशी (LDF) पंगा घेतोय. यामध्ये भाजपचे केंद्रीय नेतृत्व प्रदेश भाजपच्या नेत्यांना सर्व पातळ्यांवर प्रचंड बळ देतायेत. यातलाच एक भाग म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी विनोद तावडे यांची नियुक्ती केरळ प्रभारी म्हणून केली.



– रामदास आठवलेंची अजब सूचना

या राजकीय पार्श्वभूमीवर केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले तिरुवनंतपुरमला पोहोचले. तिथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतच त्यांनी केरळच्या कम्युनिस्ट मुख्यमंत्र्यांना सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येण्याची अजब सूचना केली. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे कम्युनिस्ट पार्टीचे बडे नेते आहेत. त्यांनी मोठा क्रांतिकारक निर्णय घेऊन केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (NDA) प्रवेश करावा. त्यांनी असा क्रांतिकारक निर्णय घेतला, तर केरळच्या विकासासाठी प्रचंड निधी उपलब्ध होईल, याचा विचार करावा, अशी सूचना रामदास आठवले यांनी केली.

– गुगली की बाउन्सर??

भाजपने एकीकडे कम्युनिस्ट पार्टीशी प्रचंड संघर्ष करायची भूमिका घेतली असताना रामदास आठवले यांच्यासारख्या केंद्रीय राज्यमंत्र्यांनीच कम्युनिस्ट मुख्यमंत्र्याला थेट भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी मध्ये सामील होण्याची सूचना केल्याने दिल्ली सह केरळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. रामदास आठवले यांच्या सूचनेवर अनेकांनी ठळक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मूळात सत्ताधारी आघाडीत कम्युनिस्ट मुख्यमंत्र्याला आमंत्रण द्यायचा अधिकार रामदास आठवले यांच्यासारख्या केंद्रीय राज्यमंत्र्याला आहे का??, असा सवालही या निमित्ताने उपस्थित झाला. पण रामदास आठवले यांनीही सूचना करून कम्युनिस्ट पार्टीला गुगली टाकली की सत्ताधारी भाजपलाच बाउन्सर टाकला असा अनेकांनी खोचक सवाल सोशल मीडियावर केला.

– भाजप – कम्युनिस्ट सहकार्य

पण ते काही असले तरी रामदास आठवले यांनी कम्युनिस्ट मुख्यमंत्र्याला अजब सूचना करून राजकीय खळबळ उडवून दिली हे मात्र निश्चित!! अर्थात कम्युनिस्ट आणि भाजप यांचे राजकीय नाते साप आणि मुंगसाचे असले, तरी त्यांनी एकमेकांना कधीच राजकीय सहकार्य केले नाही, असे मात्र घडलेले नाही उलट 1989 मध्ये तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सरकारला भाजप आणि कम्युनिस्ट पार्टी या दोघांनीही बाहेरून पाठिंबा दिला होता. विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार टिकवण्यासाठी दोन परस्पर विरोधी पक्षांनी काही काळ त्यांना सहकार्य केले होते. हा इतिहास असला तरी भाजप आणि कम्युनिस्ट यांचे नाते परस्पर विरोधी राहिले ही वस्तुस्थिती देखील दुर्लक्षित करता येणार नाही.

Kannur, Kerala: At a press conference, Union Minister Ramdas Athawale

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात