नाशिक : काँग्रेसवाले हरले तरी भांडणे आणि जिंकले तरी भांडणेच!!, असला प्रकार त्या पक्षातून समोर आलाय.Congress leaders qurrell after defeat and win also
काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत पराभूत झाला. त्यांनी ठाकरे बंधूंशी फारकत घेतली आणि वंचित बहुजन आघाडीशी युती केली. पण ती दोन्ही पक्षांना राजकीय दृष्ट्या पचली नाही. त्यामुळे मुंबईत काँग्रेसचे फक्त 24 नगरसेवक निवडून आले. २२७ पैकी 24 हा परफॉर्मन्स बघून काँग्रेसचे मुंबईतले नेते भडकले.
– भाई जगताप विरुद्ध वर्षा गायकवाड
काँग्रेसच्या या पराभवानंतर मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांमधली भांडणे पुन्हा समोर आली. मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी जाहीरपणे मुंबई प्रदेश काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांना पराभवाबद्दल जबाबदार धरून त्यांचा राजीनामा मागितला. भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांना जाहीरपणे जाब विचारल्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुद्धा दुखावले. त्यामुळे त्यांनी भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. पक्षातल्या कुठल्या नेत्याबद्दल तक्रारी करायच्या असतील, तर त्याकरिता केंद्रीय नेते उपलब्ध असताना तुम्ही माध्यमांमुळे जाऊन का तक्रारी केल्या??, याचा खुलासा करा, असे आदेश काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी भाई जगताप यांना काढले. त्यामुळे काँग्रेस मधले अंतर्गत मतभेद पराभवानंतर सुद्धा चव्हाट्यावर आले.
पण काँग्रेसचा पराभव होवो किंवा काँग्रेस जिंकून येवो, काँग्रेसच्या नेत्यांचे वर्तन सुधारले नाही आणि सुधारणार नाही, याचे प्रत्यंतर मुंबईनंतर चंद्रपुरात आले.
– वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर
वास्तविक चंद्रपुरात काँग्रेसने इतर सगळ्या पक्षांच्या पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणले. त्या महापालिकेत काँग्रेसचे 34 नगरसेवक निवडून आले, पण म्हणून काँग्रेसमधली भांडणे थांबले नाहीत. उलट ती वाढली. आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातली भांडणे चव्हाट्यावर आली. आमदार विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचे चार नगरसेवक पळवून काँग्रेसमध्ये गटबाजी सुरू केली. चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता येऊ नये. त्याऐवजी भाजपला “ऑपरेशन लोटस” करणे सोपे जावे, यासाठी वडेट्टीवार यांनी भाजपला मदत केली, असा आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला. वडेट्टीवार यांनी आमच्या चंद्रपुरात लक्ष घालू नये, नाहीतर आम्ही त्यांच्या ब्रह्मपुरीत लक्ष घालू, असा इशाराही धानोरकर यांनी दिला.
चंद्रपुरात विजय झाल्यानंतर सुद्धा खासदार आणि आमदारांमध्ये भांडणे जुंपल्याने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यात लक्ष घालावे लागले. सपकाळ यांनी विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांची एकत्र बैठक लावली. त्या बैठकीतून आपण चंद्रपुरातले भांडण सोडू असे सपकाळ म्हणाले किंबहुना त्यांना ते म्हणावे लागले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App