विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन निवडणुका लढवायचा प्रयोग केला, पण त्याला फार मर्यादित यश मिळाले. महापालिकांच्या निवडणुकांनंतर काँग्रेसने वेगळा मार्ग पत्करून जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ओबीसी बहुजन आघाडीशी युती केली. त्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडी सुद्धा ओबीसी आरक्षण वाजवायच्या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानावर आली.Vanchit Bahujan Aghadi enters Zilla Parishad election fray on the issue of saving OBC reservation!!
वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषद निवडणुकीत जी अनेक आश्वासने दिलीत, त्या आश्वासनांमध्ये ओबीसी आरक्षण वाजवायचा मुद्दा महत्त्वाचा आहे. वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषदेमध्ये सत्तेवर आली तर ओबीसी आरक्षण वाचवेल, असा दावा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी केला.
महापालिका निवडणुकांमध्ये मराठा समाजाच्या अनेक उमेदवारांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी आरक्षणातून निवडणूक लढवली त्याचा फटका मूळच्या ओबीसींना बसला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा मानला.
– प्रकाश आंबेडकरांचा शेतकऱ्यांना सवाल
शेतकरी स्वतःशी इमानदार का नाही? तो जातीशी इमानदार का आहे? शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्याचा कायदा करून देणाऱ्या पक्षाला मतदान देण्याच्या ऐवजी जात – धर्माच्या नावाने मतदान मागतो अश्या लुटारू पक्षांना शेतकरी मतदान देऊन स्वतःची फसवणूक करून घेत आहे, असे वक्तव्य ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर केले.
त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडिया हँडल वरून वेगवेगळ्या विषयांवर मतदारांना ग्वाही दिली.
– ती अशी :
– एक संधी वंचितला दिल्यावर हे सर्व शक्य आहे :
✅ दर्जेदार शिक्षण व्यवस्था ✅ रोजगाराची आधीच उपलब्धता ✅ स्वच्छ पिण्याचे पाणी, पक्के रस्ते ✅ सर्वोत्तम आरोग्य सुविधा ✅ ओबीसी आरक्षणाचे संरक्षण ✅ वंचित समूहांचा सत्तेत सहभाग ✅ शेतकरी हिताची धोरणनिर्मिती ✅ वंचितांना हक्काचे घर
एक संधी – वंचित बहुजन आघाडीला…
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App