ZP च्या निवडणुकीत अजितदादा कोणता वादा करणार??; काय मोफत देणार??; जाहीरनामा लिहिणारी कंपनी अजितदादांना कोणता सल्ला देणार??

नाशिक : पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका अजित पवार हरले. त्यांनी महायुती मधला वरिष्ठ नेत्यांचा वादा तोडून भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर टीका केली त्यांना भ्रष्टाचारी ठरविले. त्याचे प्रायश्चित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या मतदारांनी अजितदादांना दिले. त्यांना आणि त्यांच्या काकांना पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणात कुठलेही स्थानच ठेवले नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधले स्थानिक दादा राज्याच्या दादावर भारी ठरले. कारण राज्यातल्या दादाने गल्ली बोळात येऊन दादागिरी केली. Ajit Pawar

– मोफत मेट्रो प्रवासाचे गाजर

पण त्या पलीकडे जाऊन अजितदादांनी पुण्याच्या लोकांना मोफत मेट्रो प्रवासाचे गाजर दाखवून जी गेमचेंजर खेळी केली होती, ती खेळी त्यांच्यावरच उलटली. दादांनी केलेल्या फुकट मेट्रो प्रवासाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन पोलखोल केली. अजित पवारांच्या सारख्या मुरब्बी नेत्याने आणि राज्याचे अर्थमंत्रीपद भोगणाऱ्या कुठलाही अभ्यास न करता मोफत मेट्रो प्रवासाचा वादा करणे याचा इतका मोठा राजकीय विनोद नव्हता. अजित पवारांसारख्या मुरब्बी नेत्याला त्यांच्या एजन्सीने त्यांच्याकडूनच पैसे घेऊन गंडवावे, यासारखी दुसरी कुणीही त्यांची खिल्ली उडवली नव्हती. अजितदादा जाहीरनामा देणाऱ्या एजन्सी समोर गंडले. अजितदादांनी पुणेकरांना मोफत मेट्रो प्रवासाचे गाजर दाखविले. पण ते त्यांच्यावरच उलटले.



– मोफत मेट्रो प्रवासाची पुणेकरांकडून खिल्ली

वास्तविक मेट्रो प्रवासाचे दर ठरविणे हे फक्त महा मेट्रोच्या हातात असताना आणि महा मेट्रोच्या नाड्या केंद्र आणि राज्य सरकारांच्या हातात असताना अजित पवारांनी मेट्रोच्या मोफत प्रवासाचा मुद्दा “स्वबळावर” जाहीरनाम्यात लिहिणे अपेक्षितच नव्हते, पण राजकीय बुद्धिमत्तेचा अभाव आणि जाहीरनामा लिहिणाऱ्या एजन्सीवर ज्यादा विश्वास यामुळे अजितदादांनी सैलपणे मेट्रोच्या मोफत प्रवासाचे गाजर पुणेकरांना दाखविले. त्यामुळे पुण्यात ते भरपूर ट्रोल झाले. पुणेकरांनी त्यांची भरपूर खिल्ली उडवली. त्याचा परिणाम पुण्याच्या निवडणुकीवर व्हायचा तोच झाला. अजित पवारांचा वादा मतदारांनीच खोटा ठरविला.

– ZP च्या निवडणुकीत काय मोफत वाटणार??

त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत अजित पवार ग्रामीण भागातल्या जनतेला स्वबळावर काय मोफत देणार किंवा त्याची घोषणा करणार??, याविषयी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधली पवारांची सत्ता तर उखडली गेली. पुणे आणि पिंपरीतल्या स्थानिक दादांनी राज्याच्या दादाची दादागिरी सहज मोडीत काढली. आता अजित पवारांकडे राहता राहिली, ती पुणे जिल्हा परिषद. पुणे जिल्हा परिषद टिकवून ठेवण्यासाठी अजित पवार कोणते हातखंडे आजमावणार आणि पुण्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला काय काय काय मोफत वाटणार??, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जाहीरनामा लिहिणारी कंपनी अजितदादांना कोणते मुद्दे आणि कोणता फीडबॅक देणार??, याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. Ajit Pawar

– काका – पुतण्या एक होणार ही बातमीच नाही

पवार काका – पुतणे एक होणार ही बातमी आता जुनी झाली. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीत काका पुतण्यांच्या ऐक्याचा फुगा मतदारांनी फोडला त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पवार काका पुतणे एक होऊन निवडणूक लढणार ही खरी बातमीच नाही. खऱ्या बातमीची ही उत्सुकता आहे की अजित पवारांना जाहीरनामा लिहिणारी एजन्सी कोणत्या वस्तू मोफत वाटायला सांगणार आणि अजित पवार कोणत्या वस्तू मोफत वाटणार??, याकडे पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

What promise will Ajit Pawar make in the ZP elections?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात