फडणवीसांचे भाकीत ठरले खोटे; राज ठाकरे नव्हे, तर सत्तेच्या वळचणीला राहून सुद्धा पवार ठरले biggest looser!!

नाशिक : महापालिकांच्या निवडणुका संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक राजकीय भाकीत वर्तविले होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू जरी एकत्र आले असले, तरी त्यांच्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या युतीचा फायदा होईल, पण राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या युतीचा फायदा होणार नाही. राज ठाकरे हे या निवडणुकीत biggest looser ठरतील, असे फडणवीस म्हणाले होते. Raj Thackeray

– राज ठाकरेंना गमावण्यासारखे काहीच नव्हते

प्रत्यक्षात ठाकरे बंधू मुंबई महापालिका निवडणूक जिंकले नसले, तरी त्या दोघांनी मिळून 72 जागा मिळवत आपली प्रतिष्ठा थोडी फार का होईना पण टिकवली. त्याचबरोबर ज्या मुंबई महापालिकेत राज ठाकरे यांचा मनसेचा एकही नगरसेवक नव्हता, तिथे 6 नगरसेवक निवडून आले. राज ठाकरे यांच्याकडे गमावण्यासारखे काही नव्हते त्यामुळे त्यांनी निवडणुकीत जे काही केले त्यातून थोडेफार कमावलेच. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भाकीत म्हटले तर अर्धसत्य ठरले. कारण राज ठाकरे हे biggest looser झाले नाहीत.

– पवारच Biggest loser

त्याच्याबरोबर उलट जे भाकीत फडणवीसांनी सांगितले नव्हते, ते भाकीत मात्र खरे ठरले. महापालिकांच्या निवडणुकीत पवार नावाचा फॅक्टर biggest looser ठरला. कारण पवारांनी सत्तेशी चुंबाचुंबी करून सुद्धा त्यांना 29 पैकी एकाही महापालिकेत सत्ता मिळवता आली नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतली भागीदार म्हणून कुठे कुठे सत्तेचे तुकडे मोडत बसेल. परंतु, त्यांना कुठल्याही महापालिकेत दमदार कामगिरी करता आली नाही. अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये फक्त तोंडी दमदाटी केली, पण त्यांना प्रत्यक्षात दमदार कामगिरी करता आली नाही पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही महापालिकांमध्ये पवार काका – पुतण्यांचा दारुण पराभव झाला इतकेच नाही, तर त्यांचा तिथे राजकीय अस्त झाला असे म्हणायची पाळी आली. हे सगळे पवार विरोधी पक्षात असताना घडले नाही, तर पवारांनी भाजपच्या सत्तेशी चुंबाचुंबी केल्यानंतर घडले. फक्त हे फडणवीसांनी जाहीरपणे सांगितले नव्हते.

– पवारांच्या राष्ट्रवादीची शून्य कामगिरी

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधली अजित पवारांची दादागिरी भाजप मधल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांनी मोडून काढली. पिंपरी चिंचवड मध्ये महेश लांडगे हे अजित पवारांना भारी ठरले, तर पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी अजित पवारांना धोबीपछाड दिली. 29 पैकी एकाही महापालिकेत दोन्हीपैकी एकाही राष्ट्रवादीला सत्ता तर मिळवता आली नाहीच. मुंबईसारख्या महापालिकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अस्तित्व पूर्णपणे मिटून गेले. कारण त्यांना तिथे 1 जागा मिळाली. एम एम आर डी मध्ये आणि नाशिक मध्ये सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या. महत्त्वाचे म्हणजे पवार काका – पुतण्यांना किती जागा मिळाल्या, यापेक्षा त्यांना एकाही महापालिकेत सत्तेच्या जवळ सुद्धा जाता आले नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये प्रचंड जोर लावून सुद्धा भाजपच्या सत्तेला धक्का लावता आला नाही. उलट भाजपच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांकडून पवार काका – पुतण्यांना पराभवाची धुळ चाखावी लागली, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.

– संग्राम जगतापांच्या, हिंदुत्ववादाचा विजय

अहिल्यानगर मध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी भाजपबरोबर सत्तेत आली. पण तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारून भाजपचे वर्चस्व आणि नेतृत्व मान्य केले. त्यामुळे संग्राम जगताप हे स्वतंत्रपणे राजकीय कर्तृत्व दाखवू शकले. संग्राम जगताप यांनी अजित पवार आणि शरद पवारांचे पठाडीबाज राजकारण केले नाही. त्यांनी अहिल्यानगर मध्ये हिंदुत्ववादी राजकारण केले. त्याचा स्वतंत्रपणे लाभ त्यांना तिथे झाला. त्यामुळे अहिल्यानगरचे राजकीय क्रेडिट सुद्धा अजित पवारांच्या खात्यात जमा झाले नाही.

दोन्ही पवार काका पुतणे biggest looser ठरले कारण त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड हे बालेकिल्ले कायमचे गमावले.

Fadnavis’s prediction proved false; it was not Raj Thackeray.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात