Nashik Municipal Election : नाशिककरांचे भाजपला दुसऱ्यांदा बहुमत; शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मैत्रीपूर्ण आव्हान परतवले

Nashik Municipal Election

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Nashik Municipal Election सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची सत्ता राखण्यात भाजप पूर्णत: यशस्वी ठरला. १२२ जागांच्या महापालिकेत तब्बल ७२ जागा जिंकून पक्षाने एकहाती सत्ता मिळवण्यात सलग दुसऱ्यांदा यश प्राप्त केले. त्याच वेळी भाजपला आव्हान देऊ पाहणारे राज्यातील सत्तेत मित्रपक्ष असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या युतीने पूर्ण जागांवर उमेदवार देत दिलेली मैत्रीपूर्ण लढत अपयशी ठरली. विशेषत: उद्धव व राज यांनी ‘ठाकरे ब्रँड’ म्हणून एकत्र येत राज्यातील पहिली संयुक्त प्रचारसभा नाशिकमध्ये घेत मैदान मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबतच्या महाविकास आघाडीला मतदारांनी स्पष्टपणे नाकारले.Nashik Municipal Election

२०१७ मध्ये नाशिक महापालिकेत भाजपने पहिल्यांदाच ६६ जागा जिंकून पूर्ण बहुमताने सत्ता मिळवली होती. याच पार्श्वभूमीवर यंदाही निवडणुकीच्या सुरुवातीलाच महायुतीऐवजी स्वबळावर लढण्याची आणि ‘१०० प्लस’चा नारा देत तोवास्तवात आणण्यासाठी पक्षाकडून नियोजन करण्यात आले. यामध्ये सुरुवातीला सर्व पक्षांमध्ये भाजपकडेच १२२ जागांसाठी तब्बल ११६० इच्छुकांनी उमेदवारीसाठी दावे केले. त्याच वेळी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी महायुती केल्यास बंडखोरी होण्याची व जागा गमावण्याची शक्यता गृहीत धरून स्वबळावरच लढण्याचा आग्रह धरला. यामुळे सहाजिकच शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उघडपणे भाजपवर युती तोडल्याचा आरोप केला. दरम्यान, पक्षांतर्गत गटबाजी, आयारामांना प्रवेश, शहराध्यक्षांना नाराजांनी थेट कोंडून गाजर देण्याचे केलेले अनोखे आंदोलन, एबी फॉर्मवरून झालेला राडा या सर्व पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी सूत्रे ताब्यात घेत प्रचाराची व्यूहरचना आखून एकहाती विजय मिळवला.Nashik Municipal Election



आधीच राष्ट्रवादीसोबत युती

निवडणुकीसाठी राज्यात सत्तेत सहभागी भाजपसोबत शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती होण्याची शक्यता होती. मात्र, भाजप स्थानिकांनी स्बळाचा नारा दिल्याने व पक्षाकडे ११०० इच्छुक असल्याने नाराजीचा मोठा सामना करावा लागू शकतोहे लक्षात घेता युतीची केवळ चर्चाच केली. मात्र, शिवसेनेकडून अर्ज माघारीपर्यंत भाजप हा घोळ करण्याचा धोका लक्षात घेत आधीच राष्ट्रवादीसोबत युतीची घोषणा करून टाकली. त्यानुसार भाजप ११८, शिवसेना १०१, राष्ट्रवादी ३४ जागांवर युतीत लढले.

नेतृत्वाअभावी फक्त उरली नावापुरती

भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी स्थापन झाली. ठाकरे बंधूंसह काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट, इतर पक्षांनाही एकत्रित घेत शंभरहून अधिक जागा लढण्यात यशस्वी ठरले, मात्र ही आघाडी केवळ उमेदवार उभे करण्यापुरतीच राहिल्याचेही दिसून आले आहे.

विकासाचा मुद्दा व प्रभावी प्रचार यंत्रणा

कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्याने सुमारे ३० हजार कोटींचा निधी मंजूर झाल्याचा ऊहापाेह या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने करण्यात आला. यातून शहरालगत ८५ किलोमीटरच्या रिंगरोड, खड्डेमुक्त रस्ते करण्याचे आश्वासन दिले आहे.

BJP Secures Historic Majority in Nashik Municipal Election 2026 Photos VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात