पवार ब्रँडचा वाजवला बोऱ्या; चल रे तू टुणुक टुणुक भोपळ्या!!

नाशिक : महापालिका निवडणुकांमध्ये पवार नावाच्या ब्रँडचा मतदारांनी पुरता बोऱ्या वाजवला. त्याचीच मजा महाराष्ट्रातल्या अनेक व्यंगचित्रकारांनी घेतली. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी चिन्हावर बहुतांश सगळ्या महापालिकांमध्ये शून्य जागा मिळाल्या. त्यामुळेच व्यंगचित्रकारांनी पवारांना आणि सुप्रिया सुळे यांना शून्य भोपळ्यावर बसवून त्यांच्या परफॉर्मन्सशी खिल्ली उडवली.

वास्तविक महापालिका निवडणुकांसाठी पवार काका – पुतणे एकत्र लढले होते. विशेषतः त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये केंद्रित केले होते. पण तिथे अजित पवार हे एकटेच त्वेषाने लढले. त्यांना सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांची साथ मिळाली नाही. अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या गल्लीबोळ्यांमध्ये फिरले, पण सुप्रिया सुळे आणि रोहित पवार वरवरच्या प्रचाराखेरीज दुसरे काहीच करू शकले नाहीत. सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून सुरुवातीला त्यांची टिमकी वाजवली. कार्यकर्त्यांच्या मदतीला त्या आल्या नाहीत.

शरद पवार या वयात प्रचारात उतरणे शक्यच नव्हते. त्याप्रमाणे ते महापालिकांच्या प्रचारात कुठेच दिसले नाहीत. पण शरद पवारांच्या पक्षाच्या प्रचाराची धुरा सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी खांद्यावर घ्यायला हवी होती, ती त्यांनी घेतली नाही. त्यामुळेच त्यांना पवारांशेजारी शून्य भोपळ्यावर बसावे लागले. एकीकडे भाजपने दीड हजार पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणले. शिवसेनेचे साडेतीनशे पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले. शरद पवारांना दोन अंकी आकडा गाठताना सुद्धा दमछाक झाली. कारण सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी त्यांचा राजकीय वारसा व्यवस्थित सांभाळला नाही.

एनडीटीव्ही मराठी नाही दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांपैकी तब्बल 2869 नगरसेवकांपैकी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारी चिन्हावर फक्त 29 नगरसेवक निवडून आले. 29 पैकी जवळपास 22 महापालिकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 भोपळा सुद्धा फोडता आला नाही. म्हणूनच व्यंगचित्रकारांनी त्यांना भोपळ्यावर बसवून चल रे भोपळ्या टुणुक टुणुक म्हणायला लावले!!

(व्यंगचित्र : सुमंत बिवलकर)

Sharad Pawar’s NCP zero performance in cartoon

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात